‘माझं काही खरं नाही’, म्हणणारे जयंत पाटील बारामतीत शरद पवार यांना भेटले; सुप्रिया सुळे यांच्याशीही चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती. दुसरीकडे भाजप आणि अजित पवार गटाकडूनही जयंत पाटील यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान जयंत पाटील यांनीही ‘माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही’ असे म्हणत एक मोठे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्या मनात नक्की चाललेय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच जयंत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेते बारामतीमध्ये एकत्र दिसले. तत्पूर्वी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यातही तासभर चर्चा झाली.
राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा; जयंत पाटील म्हणाले, तर आठ दिवसांत राजीनामा देतो
Comments are closed.