विलीनीकरणाचा विषय संपला – जयंत पाटील
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला होता. दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण आता होणार नाही. विलीनीकरणाचा विषय हा संपला असल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आज स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा ज्यांच्यासोबत सुरू होती, ते आता दुर्दैवाने राहिले नाहीत. त्यामुळे आता त्याबाबत प्रश्नच उद्भवत नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया थांबली आहे. दोन्ही बाजूच्या भावना समजून घेणारा नेताच राहिलेला नाही. त्यामुळे हा विषय आता पूर्णपणे बंद झाला आहे. आता विलीनीकरणाची चर्चा पुढे जाणे शक्य नाही. आम्ही यावर कुणाशीही चर्चा करत नाही, असे जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
Comments are closed.