राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हातात काही नाही, त्यांचा सर्व्हर कुणीतरी दुसराच चालवतो – जयंत पाटील

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने वाय.बी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.

”महाराष्ट्रातले सर्व विरोधी पक्षाचे नेते निवडणूक आयुक्तांना भेटले व निवेदन दिले. त्या निवेदनातून महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमधील अनंत चुका दाखवल्या. केंद्रीय निवडणूक आयुक्तांना सर्व काही सांगितलं तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे पुरावे त्यांना दाखवले. पुराव्यासहित काही माहिती दिली. मतदार यादितील चुकिचे पत्ते, नाव, वय दिले आहेत. मुरबाड मतदार संघात काही मतदारांच्या घर नंबर समोर काहीच लिहलेलं नाही. कामटी विधानसभेत 868 मतदार, बडनेरात 450 मतदारसंघांत घरासमोर शून्य आकडा लिहला आहे. बऱ्याच ठिकाणी दुबार लिहलेलं आहे. एपिक नंबर एकच असतो असे मला वाटत होते. पण नालासोपारा मतदारसंघात सुषमा गुप्ता या महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह नोंदवलं आहे. 12 ऑगस्टला आपण ते दाखवलं. तीन वाजता आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं तेव्हा ती नावं होती. पण सहा वाजता ती नावं हटविण्यात आली. ही नावं कुणी काढली, कुणी तक्रार केली, हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचे व्हेरिफिकेशन व्हायच्या आत नावं काढली. राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हातात काही नाही, त्यांचा सर्व्हर कुणीतरी दुसराच चालवतो, असे जयंत पाटील म्हणाले.

Comments are closed.