सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवलं, जयंत पाटलांची केंद्र सरकारवर सडकून टीका; म्हणाले, ‘लो
Jayant Patil on Sonam Wangchuk: पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर (Jantar Mantar) येथील आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात (Hospital) दाखल केल्यानंतर या कारवाईवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत ही कारवाई अत्यंत चुकीची असल्याचे म्हटले आहे. तसेच, वांगचुक यांची प्रकृती खालावलेली असताना त्यांच्या पत्नीला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी देण्याची मागणीही त्यांनी केली.
जयंत पाटील म्हणाले की, गेल्या वीस दिवसांपासून सोनम वांगचुक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले, हे समजू शकते. मात्र, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या इतर समर्थकांना त्या ठिकाणाहून हटवण्याचे कारण समजत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, सध्या वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्या पत्नीला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यासाठी आवश्यक व्यवस्था केंद्र सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी केली.
Jayant Patil on Sonam Wangchuk: ‘आधी अटक का केली अन् नंतर सोडले का, हेच समजले नाही’
जयंत पाटील यांनी यापूर्वीच्या घटनेचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, याआधी वांगचुक यांना ताब्यात घेऊन राजस्थानमध्ये नेण्यात आले होते. त्या वेळीही त्यांच्या पत्नीला त्यांच्याशी संवाद साधण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली; मात्र त्यांना ताब्यात का घेतले आणि नंतर का सोडले, याचे उत्तर मिळाले नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
Sonam Wangchuk hunger Strike: नेमकी काय आहे पार्श्वभूमी?
गेल्या 28 जूनपासून सोनम वांगचुक हे ‘नीट’ पेपरफुटीच्या विरोधात उपोषणावर (Hunger Strike) बसले होते. त्यांच्यासोबत कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) हे देखील आंदोलनात सहभागी होते. या 20 दिवसांच्या उपोषणात वांगचुक यांचे तब्बल 9 किलो वजन घटले असून, अंतर्गत अवयवांना गंभीर इजा होण्याचा धोका डॉक्टरांनी वर्तवला होता.
या पार्श्वभूमीवर, दिल्ली हायकोर्टाच्या (High Court) आदेशाचा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी आज पहाटे वांगचुक यांना वैद्यकीय देखरेखीखाली रुग्णालयात हलवले. या कारवाईदरम्यान आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला आणि पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले. वांगचुक यांनी 20 जुलै रोजी होणाऱ्या ‘संसद मार्च’चे आवाहन केले असल्यामुळे, आगामी काळात या मुद्द्यावरून दिल्लीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, ‘त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे…’
Comments are closed.