पाकिस्तानमध्ये होणार अमेरिका व इराणमध्ये शांतता चर्चा,11 एप्रिलला होणार बैठक;जेडी वान्स राहणार उपस्थित
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर केल्यानंतर आता या आठवड्याच्या अखेरीत अमेरिका व इराणमध्ये शांतता चर्चा होणार आहे. ही चर्चा पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे होणार असून त्यासाठी. उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ या शनिवारी ११ एप्रिलला पाकिस्तानला जाणार आहे.
#पाहा | व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणतात, “उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांनी अगदी सुरुवातीपासूनच यात खूप महत्त्वाची आणि महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अर्थातच, ते राष्ट्राध्यक्षांचे उजवे हात आहेत. ते अमेरिकेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचा सहभाग आहे… pic.twitter.com/duk7dpbwb0
— ANI (@ANI) 8 एप्रिल 2026
व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी या दौऱ्याची अधिकृत घोषणा केली. त्यांनी सांगितले की जेडी वान्स यांच्या अध्यक्षेताखालील एक पथक शनिवारी पाकिस्तानला जाणार असून तिथे शांतता चर्चेचा पहिला टप्पा पार पडेल. वान्स यांच्यासोबत ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार जॅरेड कुशनेर आणि स्टीव्ह विटकॉफ हे देखील इस्लामाबादला जाणार आहेत. शनिवारी सकाळी ही स्थानिक वेळेनुसार बैठक पार पडेल. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.
Comments are closed.