अन् जेडी व्हान्स यांच्या पत्नीचा तोल गेला, स्वतःला सावरल्याने बाळ सुरक्षित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या पत्नी उषा व्हान्स यांचा हेलिकॉप्टरमधून उतरत असताना अचानक तोल गेला, परंतु त्यांनी क्षणांत स्वतःला सावरले. यावेळी त्यांच्यासोबत नऊ आठवडय़ांचे त्यांचे बाळही होते.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये उषा व्हान्स हेलिकॉप्टरच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसतात. एका हाताने रेलिंग पकडून त्या खाली येत असताना काही पायऱ्या उतरल्यावर त्यांचा अचानक तोल जातो आणि त्या पुढे झुकतात. मात्र त्यांनी तत्काळ स्वतःला सावरले आणि बाळाला कोणताही धोका पोहोचू नये याची काळजी घेतली. त्यानंतर त्या हेलिकॉप्टरकडे वळून पती जेडी व्हान्स यांना आपण ठीक असल्याचा इशारा करताना दिसतात.

Comments are closed.