जेफ बेजोस साठीत गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणार! पाच हजार कोटींचा खर्च
इ–वाणिज्य वेबसाईट ऍमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत दुसरे व्यक्ती असलेले जेफ बेजोस हे 55 वर्षीय गर्लफ्रेंड लॉरेन सांचेज सोबत लग्नगाठ बांधणार आहेत. जेफ बेजोस यांचे वय सध्या 60 वर्षे आहे. 2019 मध्ये दोघांनीही आपापल्या जोडीदारांना घटस्फोट दिला होता. जेफ बेजोस आणि आणि लॉरेन सांचेज यांचा विवाह 28 डिसेंबरला कोलोराडोच्या एस्पेनमध्ये थाटामाटात पार पडणार आहे. या शाही सोहळ्यावर 600 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल पाच हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. केविन कॉस्टनरच्या 160 एकरच्या व्हीआयपी फार्मवर हा विवाह सोहळा रंगणार आहे. शाही विवाह सोहळ्याआधी म्हणजेच 26 आणि 27 डिसेंबरला पॉश सुशी रेस्तरां मात्सुहिसा सेलिब्रेशन होणार आहे. या लग्न सोहळ्याला बेजोस आणि सांचेज यांचे कुटुंब, बिल गेट्स यांच्यासह जवळचे मित्रमंडळी सहभागी होण्याची शक्यता आहे.
जेफ बेजोस यांची नेटवर्थ 20.26 लाख कोटी रुपये आहे. ते जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते ऍमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ आहेत. न्यूज मीडिया हाऊस द वॉशिंग्टन पोस्टचे मालक, ब्लू ओरिजनल नावाच्या सब–ऑर्बिटल स्पेसफ्लाईट सेवेचे संस्थापक आहेत. बेजोस यांनी ज्या यॉटवर साखरपुडा केला त्याची किंमत चार हजार कोटी रुपये आहे.
बेजोसला तीन तर लॉरेनला दोन मुले
बेजोस यांनी आपल्या नव्या सुपरयॉटवर लॉरेनला प्रपोज केले होते. या वेळी बेजोस यांनी तिला 20 कॅरेट हिऱयाची अंगठी दिली होती. लॉरेन पत्रकार होती. ती हेलिकॉप्टर पायलट आणि ब्लॅक ऑप्स एविएशनची संस्थापकसुद्धा आहे. 2005 मध्ये लॉरेनने हॉलीवूड एजंट पॅट्रिक व्हाइटसेलसोबत लग्न केले होते. 13 वर्षे सोबत राहिल्यानंतर 2019 मध्ये पॅट्रिकपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पॅट्रिकपासून तिला दोन मुले आहेत, तर बेजोस यांनी 25 वर्षांनंतर 2019 मध्ये पत्नी मॅकेंजी स्कॉटपासून घटस्फोट घेतला. बेजोस यांना तीन मुले आहेत. मॅकेंजी जगातील श्रीमंत महिलांपैकी एक आहे. तिने सायन्सचे शिक्षक डॅन ज्वेटसोबत लग्न केले आहे.
Comments are closed.