जिओकडून मोठी घोषणा! IPL मोफत पाहण्यासाठी लागू केली ‘ही’ भन्नाट ऑफर; जाणून घ्या सविस्तर…
जिओस्टार विनामूल्य सदस्यता: गेल्या अनेक दिवसांपासून लोक आयपीएलची वाट पाहात होते. येत्या 22 मार्च रोजी यंदाच्या आयपीएल हंगामाचा पहिला सामना होणार आहे. त्याआधीच यावेळी आपयपीएल नेमका कुठे पाहावा? आयपीएलचे सामने पाहण्यासाठी पैसे भरावे लागणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत. असे असतानाच आता जिओने क्रिकेटच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्पर्धा आणि आयपीएल लक्षात घेऊन जिओने 90 दिवसांसाठी मोफत जिओस्टार सबस्क्रीप्शनची ऑफर आणली आहे. ही ऑफर नेमकी काय आहे? ते जाणून घेऊ या…
नेमकी ऑफर काय आहे?
आगामी आयपीएलचा हंगाम लक्षात घेऊन जिओ या टेलकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत जिओ सिमकार्ड वापरकर्त्यांना तब्बल 90 दिवस जिओहॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. जिओ सिमकार्ड असणाऱ्यांनाच ही ऑफर लागू असेल. ही ऑफर मिळवण्यासाठी जिओ सिमकार्ड वापरकर्त्यांना कमीत कमी 299 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. कमीत कमी 299 रुपयांचे रिचार्ज करणाऱ्यालाच आगामी 90 दिवसांसाठी म्हणजेच तीन महिने जिओस्टारचे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. ही ऑफर 31 मार्च 2025 पर्यंत लागू असणार आहे.
कथा | जिओने क्रिकेट हंगामाच्या अगोदर 90-दिवसांच्या विनामूल्य जिओहोटस्टार सदस्यता जाहीर केली
वाचा: https://t.co/ur2rott1uw pic.twitter.com/x9f88TSMNC
– प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@pti_news) मार्च 17, 2025
नव्याने जिओचे सिमकार्ड घेणाऱ्या व्यक्तीलाही ही ऑफर लागू होईल. मात्र त्यासाठी त्या व्यक्तीला कमीत कमी 299 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल.
दरम्यान, जिओच्या या ऑफरचा अनेकांना फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. क्रिकेटवर प्रेम असणाऱ्यांनी या ऑफरचा लाभ घेतला तर त्यांना आगामी दोन महिने जिओचे सामने मोफत पाहता येणार आहेत.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
हेही वाचा :
अधिक पाहा..
Comments are closed.