Jitendra Awhad alleges that the match between Prithviraj Mohol and Shivraj Rakshe was fixed


पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला. पृथ्वीराज मोहोळ याने गादी विभागात सुरुवातीला नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा पराभव केला. मात्र शिवराज राक्षेने पराभव मान्य नसल्याचे म्हणत पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली. त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले. याप्रकरणी आता वाद वाढताना दिसत आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी सामन्याचा व्हिडीओ ट्वीट करत कालची मॅच फिक्सच होती, असा गंभीर आरोप केला आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत रविवारी (2 फेब्रुवारी) महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला. पृथ्वीराज मोहोळ याने गादी विभागात सुरुवातीला नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा पराभव केला. मात्र शिवराज राक्षेने पराभव मान्य नसल्याचे म्हणत पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली. त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले. याप्रकरणी आता वाद वाढताना दिसत आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी सामन्याचा व्हिडीओ ट्वीट करत कालची मॅच फिक्सच होती, असा गंभीर आरोप केला आहे. (Jitendra Awhad alleges that the match between Prithviraj Mohol and Shivraj Rakshe was fixed)

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करताना म्हटले की, काल महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना झाला अन् आश्चर्यकारक निकाल लागला. या उपांत्य फेरीच्या लढतीचा व्हिडीओ मी खाली टाकला आहे. हा व्हिडीओ कुणीही बघू शकतो. शिवराज राक्षेची पाठ जमिनीला लागलीच नाही. त्याची कूस जमिनीवर लागली. पण शिवराजची कूस जमिनीला लागल्यावर पृथ्वीराज मोहोळ कुस्ती जिंकला, असे जाहीर करण्यात आले. कूस लागल्यावर प्रतिस्पर्धी जिंकत नसतो, हे सांगण्यासाठी कोणा कुस्तीतज्ज्ञाची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Maharashtra Kesari 2025 : पंचांच्या चुकीच्या निर्णयावर आता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मातीला पाठ लागली तरच चितपट घोषित केले जाते. ही तर मॅटवरची कुस्ती आहे, त्यामुळे सगळेच स्पष्ट दिसते. सध्याच्या टीव्ही कॅमेरांमुळे तर अधिकच स्पष्टता येते. म्हणूनच ही कुस्ती फिक्स होती. मॅच फिक्सिंग होती, हे उभ्या महाराष्ट्राला कळले आहे. कुस्तीत हे कुठलं राजकारण शिरलंय. असो, पण या कुस्तीमध्ये खरा जिंकला तो शिवराज राक्षेच. ठरवून पृथ्वीराज मोहोळ याला जिंकविण्यात आले. अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड यानेही पंचांच्या पक्षपाती धोरणाचा निषेध करत मैदान सोडले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुधात विरजण कोण घालतंय? एवढं “मोहोळ” का उठले? असे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत.

हेही वाचा – Shivraj Rakshe : ‘शिवराज पराभूत झाल्याचे सिद्ध झाल्यास एक कोटींचे बक्षीस देणार,’ कोणी दिले आव्हान?





Source link

Comments are closed.