Jitendra Awhad criticizes Dhananjay Munde saying he can become a modern Tukaram Maharaj


दोन दिवसांपूर्वी भगवान गडचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. संतोष देशमुख यांचा हत्या केली त्यांची मानसिक अवस्था देखील पाहावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नामदेव शास्त्री यांच्यावर निशाणा साधताना धनंजय मुंडे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

मुंबई : बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकवर्तीय वाल्मीक कराड याच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधी पक्ष करताना दिसत आहेत. मात्र अद्यापही धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताना दिसत नाही. अशातच दोन दिवसांपूर्वी भगवान गडचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. संतोष देशमुख यांचा हत्या केली त्यांची मानसिक अवस्था देखील पाहावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नामदेव शास्त्री यांच्यावर निशाणा साधताना धनंजय मुंडे यांच्यावर खोचक टीका केली आहे. (Jitendra Awhad criticizes Dhananjay Munde saying he can become a modern Tukaram Maharaj)

30 जानेवारी रोजी बीड डीपीडीसी बैठक संपल्यानंतर धनंजय मुंडे हे भगवान गडावर गेले होते. त्यांनी भगवान गडावर रात्री मुक्काम करत महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत चर्चा केली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. त्यांनी म्हटले होते की, जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध चालू आहे. ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, त्यांची मानसिकता का नाही दाखवली. त्यांनाही अगोदर मारहाण झाली होती, ते सुद्धा दखल घेण्याजोगे आहे. धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत. मी धनंजय मुंडे यांना म्हणालो की, तुम्ही वारकरी सांप्रदायामध्ये असता तर एवढा त्रास सहन केल्यानंतर मोठे संत झाला असता. कारण धनंजय मुंडे यांनी त्याचं घर फुटलं तेव्हा भरपूर सोसलं आहे. गेल्या 53 दिवसांपासून त्याची मानसिक अवस्था खालावली आहे. त्यांच्या हाताला आता सलाईन लावलेलं आहे. असं राजकारण चांगलं नाही. पण या गोष्टीचा फार काळ फायदा होईल, असं मला वाटत नाही, असेही नामदेव शास्त्री म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – Beed Murder : दोन दिवसांतच नामदेव शास्त्रींचा यू-टर्न; म्हणाले, भगवानगड गुन्हेगारांच्या पाठीशी नाही

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

दरम्यान, जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पंकजा मुंडे आपल्याकडे आल्या नसल्याने मी त्यांची बाजू घेतली नाही, असे महंत म्हणाले. तसेच त्यांनी वाल्मीक कराडला आरोपी म्हटले असले तरी धनंजय मुंडे हे मंत्री असल्याने त्यांची बाजू घेतली आहे. परंतु संतांनी शेवटच्या माणसाचे ऐकले पाहिजे. मूळात ते ज्या गादीचा वारसा चालवित आहेत त्या गादीला मोठी परंपरा आहे. भगवान गडाची जागा एका कासार समाजातील व्यक्तीची आहे. त्यानंतर राजपूत समाजाचे भीमसेन महाराज त्या ठिकाणी आले. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते. बाबासाहेबांच्या मनमाड परिषदेत संत भीमसेन महाराज सामील झाले होते. त्यांना कुणाला त्या जागेवर बसवायच होतं आणि तिथे कोण मोटारसायकलवर येऊन बसलं हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु संत तुकाराम यांची कधी जात चर्चेत आली नाही. त्यांना संपूर्ण महाराष्ट्राने संतपदी नेले होते. त्यामुळे भगवान गडाच्या गादीचा मान राखायला हवा. त्यांच्या वक्तव्यामुळे आता धनंजय मुंडे हे आधुनिक तुकाराम महाराज देखील होऊ शकतात, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

हेही वाचा – Nitesh Rane : महायुती अस्वस्थ नाही; राणेंचा शिंदेंच्या मंत्र्यांनाही टोला, त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये



Source link

Comments are closed.