Jitendra Awhad NCP SP demanded Manikrao Kokate resignation in legislative advisory committee meeting in marathi
मुंबई : नुकतेच नाशिक जिल्हा न्यायालयाने मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे तसेच त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी 2 वर्ष कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्रासोबत निकालपत्र पाठवले आहे. यावेळी ते म्हणाले की, “सुनील केदार, राहुल गांधींना एक न्याय, सत्ताधारी माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का?” असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. (Jitendra Awhad NCP SP demanded Manikrao Kokate resignation in legislative advisory committee meeting)
हेही वाचा : Andhare Vs Gorhe : नीलम गोऱ्हे हे नाव उच्चारले की, मला आठवतात…; सुषमा अंधारेंची बोचरी टीका
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “आरोपी क्रमांक एक म्हणजेच माणिकराव कोकाटे हे एक राजकारणी आहेत. तसेच ते वकिल असून त्यांना गुन्हांची माहिती असतानाही त्यांनी हे कृत्य केले. वैयक्तीक लाभापोटी योजनेमधील मालमत्ता हडप केली. न्यायालयाने जे सांगितले ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्काराला डाग लावल्यासारखे आहे. न्यायालयाने सांगितले की, मंत्री असल्याने प्रतिष्ठा खराब होऊ शकते. बेकायदेशीर कृत्य केल्याने कायदा त्यांना माफ करू शकत नाही. कोणीही असले तरीही हा फसवणुकीचा गुन्हा माफ करणे योग्य नाही, हा संदेश देणे आवश्यक आहे. ज्यावेळी न्यायालय म्हणते की, संदेश देणे आवश्यक आहे. त्यावेळी विधीमंडळाचेही काम आहे फसवणुकीच्या गुन्हामध्ये प्रचलित कायद्यानुसार राजीनामा घ्यायलाच हवा.” असे म्हणत त्यांनी मागणी केली.
नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना एका जुन्या प्रकरणात दोषी ठरवले. सुनील केदार आणि राहुल गांधी यांना एक वेगळा न्याय तर सत्ताधारी माणिकराव कोकाटे यांना एक वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्चपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ कामगार सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीला विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे बैठकीला उपस्थित नव्हते. पण जितेंद्र आव्हाड यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
Comments are closed.