आशिषजी, राजकारणात, राजकारणात एवढा अभिमान नको, सूरज निकलता है उस रात कोराबता बीफोल्ड; जितेंद्र अवडांच


आशिष शेलार यांच्यावर जितेंद्र आव्हाड : आगामी उरण नगरपरिषद निवडणुकीत (Uran Nagar Parishad Election) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) तीन तेरा वाजतील, अशी टीका काही दिवसांपूर्वी भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Faction) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या भावना घाणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Jitendra Awhad on Ashish Shelar: जितेंद्र आव्हाडांचे आशिष शेलारांना प्रत्युत्तर

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “आशिषजी, गर्विष्ठाचे घर नेहमी रिकामं होतं. राजकारणात एवढा गर्व ठेवू नये. घर नेहमी खाली होतं. सूरज निकलता है तो रात को डुबता भी है, हे लक्षात ठेवा, असे म्हणत त्यांनी आशिष शेलारांच्या ‘महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजवणार’ या टीकेला प्रत्युत्तर दिले.

Bhavana Ghanekar: काय म्हणाल्या भावना घाणेकर?

तर यावेळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भावना घाणेकर यांनी उरण शहराचा विकास हाच आमचा अजेंडा असून, उरणवासियांनी काम करण्याची संधी दिल्यास नक्कीच शहराचा चेहरामोहरा बदलू अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी महाविकास आघाडीचे घटक असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे स्थानिक नेते महेंद्र घरत उपस्थित होते.

Uran Nagar Parishad Election: उरणची निवडणूक चुरशीची होणार

दरम्यान, उरण नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उरण शहरात भाजप महायुतीने मोठे शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भाजप नेते आशीष शेलार यांच्या उपस्थितीत भाजप–महायुतीच्या नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी एकूण 22 जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. नगराध्यक्षपदासाठी शोभा कोळी–शहा या प्रथमच रिंगणात उतरल्या आहेत. यावेळी गणपती चौक ते उरण नगरपालिका कार्यालयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे रॅलीत उत्साहाचे वातावरण होते. यावेळी येत्या निवडणुकीत भाजप महायुतीची मते दुप्पट होतील, तर विरोधकांचे तीन तेरा वाजतील,’ असा विश्वास आशीष शेलार यांनी व्यक्त केला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उरणची निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा

Pimpri-Chinchwad: नगरसेवक व्हायचंय, म्हणून मतदारांना 50 टक्क्यांत वस्तूंचं आमिष दाखवलंय, पिंपरी चिंचवडमध्ये ‘हे’ कुठं सुरुये?

आणखी वाचा

Comments are closed.