जेएनपीएची ई-स्पीड बोट ‘नापास’, चाचणीत अपेक्षित वेग नाही, बॅटऱ्यांच्या चार्जिंगला उशीर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जेएनपीएची ई-स्पीड बोट ‘चाचणी’ परीक्षेत सपशेल नापास झाली आहे. या बोटीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असून बॅटरी चार्जिंग करण्यासाठीदेखील उशीर होत असल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या ई-बोटी आता सायडिंगला गेल्या असून ३८ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूदही रद्द करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

जेएनपीए जेट्टी ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत कामगारांना जलद प्रवास करण्यासाठी दोन ई-बोटी तयार करण्याचे कंत्राट माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीला देण्यात आले होते. या बोटी ३५ ते ४० मिनिटांतच गेट वे ऑफ इंडिया ते जेएनपीएची जेट्टी हे अंतर गाठतील अशी अपेक्षा होती. १० ते १२ प्रवाशांची क्षमता त्याचे असून गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत या ई-स्पीड बोटी जेएनपीएच्या सेवेत दाखल होतील अशी घोषणाही करण्यात आली होती.

प्रत्यक्ष प्रवास सुरू होणार तरी केव्हा?

माझगाव डॉकमध्ये अत्याधुनिक बनावटीच्या दोन ई-बोटी तयार झाल्यानंतर तज्ज्ञांच्या उपस्थितीत त्याची चाचणी घेण्यात आली. त्यावेळी जेएनपीएच्या मानांकनाप्रमाणे या बोटी नसल्याचे आढळून आले. या बोटींचा उपयोग बंदरात विविध कामांसाठी येणारे शेकडो कामगार तसेच प्रवाशांसाठीदेखील झाला असता, पण अजूनपर्यंत या बोटी प्रतीक्षेतच आहेत. प्रत्यक्षात ई-बोटींचा प्रवास सुरू होणार तरी केव्हा, असा सवाल प्रवासी व कामगारांनी केला आहे.

Comments are closed.