ट्रम्प लोकांचा आवाज दाबून त्यांच्या सत्तेचा गैरवापर करत आहेत, जो बायडेन यांची टीका

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ट्रम्प प्रशासन लोकांच्या आवाज दाबत असून, सत्तेचा गैरवापर करत आहे, असा आरोप बायडेन यांनी केला. “ट्रम्प हे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचा भंग करत आहेत. ते विरोधकांना थांबवण्यासाठी सरकारी तंत्राचा वापर करत आहेत,” असे बायडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. हे विधान ट्रम्प यांच्या अलीकडील धोरणांवरून आले असून यामुळे अमेरिकेतील राजकीय वातावरण तापले आहे.

जो बायडेन म्हणाले आहेत की, “अमेरिकेत राष्ट्रपतींचे अधिकार मर्यादित असले पाहिजेत. संसद आणि न्यायालये त्यांना योग्य वाटेल तसे काम करायला हवे.” ते म्हणाले, “हा कठीण काळ आहे, पण आपण हताश होऊ नये. आपण पुन्हा योग्य मार्ग शोधू आणि पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊन बाहेर पडू.”

Comments are closed.