एकच युद्ध 38 वेळा संपवल्याबद्दल ट्रम्प यांना नोबेल द्या! बायडेन यांच्या मुलाने उडवली खिल्ली
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. हंटर यांनी एक्सवर म्हटले की, ट्रम्प यांनी इरणासोबतचे युद्ध संपल्याची घोषणा 38 वेळा केली आहे. त्यामुळे एकच युद्ध 38 वेळा संपवल्याबद्दल त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यायला हवा.
इतिहासात कोणत्याही अध्यक्षाने एक युद्ध इतक्या वेळा संपवले नाही. मी अधिकृतपणे डोनाल्ड जे. ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करतो. काही महिन्यांपूर्वी ट्रम्प म्हणाले होते की, त्यांनी आठ मोठी युद्धे थांबवली आहेत आणि सैद्धांतिकदृष्टय़ा प्रत्येक युद्ध थांबवल्याबद्दल त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा, असे हंटर यांनी म्हटले आहे.
Comments are closed.