जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात तरुणाचा पाय अडकला

मुंबई उपनगरात पश्चिम-द्रुतगती मार्गावर असलेल्या जोगेश्वरी मेट्रो स्थानकाखाली असलेल्या खड्डय़ात तरुणाचा पाय अडकला. त्या तरुणाने खड्डय़ातून पाय बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण त्यात त्याला यश आले नाही. यामुळे पोलिसांनी अखेर अग्निशमन दलाच्या मदतीने चार तासांनी त्या तरुणाची सुटका केली. शुक्रवारी रात्री उशिरा जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखालून जात असताना रस्त्यावर असलेल्या खड्डय़ात सिद्धेश नावाच्या तरुणाचा पाय अडकला. सिद्धेश याने साथीदारांच्या मदतीने त्या खड्डय़ातून बाहेर येण्याचा बराच प्रयत्न केला, पण सिमेंट काँक्रीट रस्त्यावर असलेल्या खड्डय़ातून त्याचा पाय काही केल्या बाहेर येत नव्हता. त्यामुळे सिद्धेश खूपच घाबरला आणि ऑक्सिजन पातळी कमी झाली. या घटनेची माहिती मिळतात पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने रस्ता खोदून चार तासांनी त्या तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली.
Comments are closed.