Jogeshwari police arrested five men after a 12 year old girl rape mumbai rape case
मुंबई : पुण्यातील स्वारगेट बसस्थानक घडलेल्या बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील जोगेश्वरी भागात 12 वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या काकांसोबत राहते. 24 फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यावर ती बेपत्ता झाली होती. पीडित मुलीचे काका चालक आहेत. त्यांनी 26 फेब्रुवारी गुन्हा दाखल केला होता.
यातच पीडित मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना रेल्वे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तिची चौकशी केली असताना तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी तातडीने जोगेश्वर पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पीडित मुलीच्या जबाबानंतर आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी 5 नराधमांना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी एसी दुरूस्त करणारे आहेत. जमाल, आफताब, महफूज, हसन आणि जाफर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
नेमके घडलेले काय?
शाळा सुटल्यावर घरी उशीरा आल्याने पीडित मुलीचे काकांसोबत वाद झाला. त्यामुळे ती घराबाहेर पडली आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर आली. तिथून ती एका मुलासोबत वांद्रे बॅण्ड स्टँडला गेली. त्यानंतर ती माघारी फिरली. त्याचवेळी पाच तरूणांनी पीडित मुलगी एकटी असल्याचे पाहून तिला कशाचे तरी आमिष दाखवले आणि मरीन ड्राईव्हला घेऊन गेले.
त्यानंतर आरोपी पीडितेला जोगेश्वरीतील संजय नगर भागातील घरी घेऊन गेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. परत, आरोपींनी तिला दादार रेल्वे स्थानकाजवळ सोडून दिले. ती एकटी भटकत असल्याचे रेल्वे पोलिसांनी आढळून आली. मग हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. जोगेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा : ‘मुंबईत मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही’ म्हणणाऱ्या जोशींवर राऊत संतापले; म्हणाले, हे तर औरंगजेबापेक्षा…
Comments are closed.