चक्रवर्तीच्या कामगिरीला दाद नाही, कॅरेबियन खेळाडूला मिळाला 'आयसीसी'चा मोठा पुरस्कार

अलीकडेच, वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. पण असे असूनही, तो आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जिंकण्यापासून वंचित राहिला. वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज जोमेल वॉरिकनने वरुण चक्रवर्तीला मागे टाकून आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला. इंग्लंडविरुद्धच्या 5 टी20 सामन्यांच्या मालिकेत वरुण चक्रवर्तीने 14 विकेट्स घेतल्या. तर दुसरीकडे, जोमेल वॉरिकनने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत 19 विकेट्स घेतल्या. खरंतर, वरुण चक्रवर्तीला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु त्याला निराशा सहन करावी लागली.

दरम्यान, आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकल्यानंतर, “वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज जोमेल वॉरिकन म्हणाला की, हा पुरस्कार जिंकणे हा सन्मान आहे. या वर्षी माझे एक लक्ष्य कसोटी क्रिकेटमध्ये पहिले पाच बळी घेणे होते, पण ते इतक्या शानदार पद्धतीने होईल असे मला कधीच वाटले नव्हते. माझ्या क्रिकेट प्रवासातील हे एक छोटेसे पाऊल आहे, येणाऱ्या काळात चांगल्या कामगिरीची आशा आहे”. त्याने असेही म्हटले की मी माझ्या कर्णधाराला या मालिकेसाठी काहीतरी खास करण्याचे वचन दिले होते. याशिवाय, माझ्या वडिलांनी भाकीत केले होते की मी एक संस्मरणीय कामगिरी करेन.

इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत वरुण चक्रवर्तीने आपल्या घातक गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांना खूप त्रास दिला होता. या मालिकेतील 5 टी20 सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्तीने 9.86 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या. तसेच, सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वरुण चक्रवर्ती अव्वल स्थानावर राहिला. दरम्यान, या यादीत इंग्लिश वेगवान गोलंदाज बेर्डेन कार्स दुसऱ्या स्थानावर होता. बियर्डवे कार्सेने 4 सामन्यांमध्ये 14.89 च्या सरासरीने 9 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा-

माजी क्रिकेटपटूची गौतम गंभीरच्या प्रशिक्षणावर मोठी प्रतिक्रिया! म्हणाला…
भारत-इंग्लंड संघातील तिसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या एका क्लिकवर
Ranji Trophy; अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकाने बीसीसीआयचे लक्ष वेधले

Comments are closed.