ज्या बापाने क्रिकेटचे धडे दिले, त्याला अखेरचा निरोप देऊन बॅट हातात, वडिलांच्या मृत्यूनंतर दुसऱ्

जोस बटलर वडिलांचे निधन झाले: इंग्लंडचा क्रिकेटपटू जॉस बटलर यांच्यासाठी मागील आठवडा खूपच वेदनादायी ठरला. त्याच्या आयुष्यातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचा, म्हणजेच त्याच्या वडिलांचे निधन झाले. ज्या बापाने त्याला लहानपणापासून क्रिकेटचे धडे दिले, त्यालाच अखेरचा निरोप देण्याची वेळ आली. अशा प्रसंगी अनेकजण खचून जातात, पण बटलरने वडिलांच्या निधनाचा आघात आपल्या खेळावर होऊ दिला नाही. वडिलांच्या निधनानंतर अगदी कमी वेळातच तो ‘द हंड्रेड’ स्पर्धेत मॅनचेस्टर ओरिजिनल्ससाठी मैदानावर उतरला.

वडिलांच्या निधनानंतर पहिला सामना

जॉस बटलरच्या वडिलांचा मृत्यू (Jos Butler Father Passed Away) आठवड्याच्या सुरुवातीस झाला. आणि त्याच आठवड्यात 9 ऑगस्ट रोजी, त्याने मॅनचेस्टर ओरिजिनल्ससाठी ‘द हंड्रेड’ मध्ये आपला पहिला सामना खेळला. या पहिल्या सामन्यात जरी ते खेळायला आला तरी त्याच्यावर वडिलांच्या निधनाचा सखोल शोक स्पष्ट दिसला. त्याने फक्त 4 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. त्या दिवशी मॅनचेस्टर ओरिजिनल्सच्या सर्व खेळाडूंनी जॉस बटलरच्या वडिलांना निधनानंतर काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले आणि श्रद्धांजली वाहिली.

वडिलांना शेवटची भावूक निरोप

त्यांच्या वडिलांना अखेरचा निरोप देताना जॉस बटलरने इंस्टाग्राम स्टोरीवर एक भावपूर्ण मेसेज शेअर केला. त्यांनी लिहिले, “तुझ्या आत्म्याला शांती लाभो, डॅड. मला दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद.”

वडिलांचा मृत्यू कधी झाला?

जॉस बटलरने ‘द हंड्रेड’ च्या 2025 च्या सत्रातील आपला पहिला सामना 6 ऑगस्ट रोजी खेळला होता, ज्यात त्याने 22 धावा केल्या होत्या. वडिलांचा मृत्यू या आणि 9 ऑगस्टच्या पहिल्या सामन्याच्या दरम्यान झाला. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर खेळलेल्या पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. अशा वेळी मैदानावर उतरणे आणि संघासाठी खेळणे सोपे नसते, परंतु अशा वेळीही बटलर त्याच्या संघासोबत खंबीरपणे उभा राहिला.

हे ही वाचा –

Priyank Panchal News : ‘क्रिकेटच्या पलिकडेही जग असतं…’; 14,050 धावा अन् 35 शतके, तरी टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने का घेतली निवृत्ती?

AUS vs SA 1st T20I : मुंबई इंडियन्सने ज्याला बाहेर बसवले होते, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला कहर, अन् रचला इतिहास

आणखी वाचा

Comments are closed.