एफसीआरए विधेयकावर आज जेपीसीची बैठक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘परकीय योगदान नियमन सुधारणा विधेयक, 2026’ची (एफसीआरए) योग्यता ठरवण्यासाठी संसदेची संयुक्त समिती (जेपीसी) मंगळवार, 29 सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा बैठक घेणार आहे. ही जेपीसी बैठक संसद भवनात होणार आहे. या बैठकीत, गृह मंत्रालय आणि कायदा व न्याय मंत्रालयाचे अधिकारी प्रस्तावित कायद्यातील विविध तरतुदींविषयी जेपीसी सदस्यांना माहिती देतील. या बैठकीला स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांचीही उपस्थिती असेल. ही बैठक नुकत्याच स्थापन झालेल्या संयुक्त समितीची दुसरी बैठक आहे. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार ही बैठक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 या वेळेत समिती कक्ष 3 मध्ये होणार असून समिती सदस्य आपल्या क्षेत्रातील तज्ञ आणि हितधारकांचे म्हणणे समजून घेणार आहेत.
Comments are closed.