हिंदुस्थानने जपानच्या तोंडचा घास हिरावला; अखेरच्या 59 सेपंदांत गोल करून सामना बरोबरीत
ज्युनियर हॉकी आशिया चषक स्पर्धेत हिंदुस्थानच्या पुरुष संघाने जपानच्या घशापर्यंत गेलेला सामना अक्षरशः शेवटच्या क्षणी हिरावून घेतला. जपानने 3-2 अशी आघाडी घेत हिंदुस्थानला काsंडीत पकडले होते, मात्र सामना संपण्यास अवघे 59 सेपंद बाकी असताना कर्णधार अनमोल एका याने पेनल्टी कॉर्नरवर गोल झळकवत सामना 3-3 असा बरोबरीत सोडवून हिंदुस्थानला दिलासा दिला.
हिंदुस्थानने सामन्याची आक्रमक सुरुवात करत चौथ्याच मिनिटाला आघाडी घेतली. फाऊलनंतर मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर अनमोलने गोल करत हिंदुस्थानचे खाते उघडले. दहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर आशू मौर्य याने गोल करत हिंदुस्थानची आघाडी 2-0 केली, मात्र पुढच्याच मिनिटाला जपानच्या यूशिन सासाकी याने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत सामन्यात रंगत आणली. मध्यंतरापर्यंत हिंदुस्थानने 2-1 अशी आघाडी कायम राखली.
तिसऱया क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. जपानने बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र हिंदुस्थानी बचावफळीने त्यांचे डाव हाणून पाडले. चौथ्या क्वार्टरमध्ये मात्र जपानने हिंदुस्थानची काsंडी केली. काजुकी नाकानिशी याने 48 व्या मिनिटाला गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला. त्यानंतर अखेरच्या क्षणात हिंदुस्थानवर दबाव वाढवत नाकानिशीने 59 व्या मिनिटाला पुन्हा गोल केला आणि जपानला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली.
हिंदुस्थानने पराभव टाळण्यासाठी गोलरक्षक बाहेर काढत आक्रमणाची धार आणखी तीव्र केली. त्याचा अचूक फायदा शेवटच्या क्षणी मिळाला. सामना संपण्यास अवघे 59 सेपंद शिल्लक असताना हिंदुस्थानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. अनमोल एका याने पुन्हा जबाबदारी खांद्यावर घेतली आणि गोल करत जपानच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरले.
हिंदुस्थानने याआधी ‘अ’ गटात पहिल्या सामन्यात इंडोनेशियाचा 14-0 असा धुव्वा उडवला होता. आता हिंदुस्थानचा पुढील सामना मंगळवारी कोरियाविरुद्ध होणार आहे.
महिलांचा मलेशियावर गोलांचा पाऊस!
हिंदुस्थानी महिला संघाने मात्र मलेशियाला अक्षरशः धूळ चारत 11-1 असा एकतर्फी विजय मिळवला. हिंदुस्थानकडून पूजा साहू आणि पूर्णिमा यादव यांनी प्रत्येकी दोन गोल केले. बिनिमा धन, कृष्णा शर्मा, सुखवीर काwर, गीता यादव आणि सनिका चंद्रकांत माने यांनी प्रत्येकी एक गोल केला. या विजयासह हिंदुस्थानने सलग दुसरा विजय नोंदवत एलीट गटामध्ये 6 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. पहिल्या सामन्यात कोरियाला नमवणारा हिंदुस्थान आता मंगळवारी जपानाशी भिडेल.
Comments are closed.