‘ज्युरासिक पार्क’ फेम अभिनेते सॅम नील यांचे निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि गाजलेल्या ‘ज्युरासिक पार्क’ चित्रपटात डॉ. ॲलन ग्रँट ही मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते सॅम नील यांचे निधन झाले आहे. सॅम नील हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योल मालवली.

‘ज्युरासिक पार्क’ने दिली जागतिक ओळख

1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्टीव्हन स्पिलबर्ग यांच्या ‘ज्युरासिक पार्क’ या चित्रपटाने जगभरात इतिहास रचला. या चित्रपटात सॅम नील यांनी साकारलेले जीवाश्मशास्त्रज्ञ ‘डॉ. ॲलन ग्रँट’ हे पात्र प्रचंड लोकप्रिय झाले. डायनासोरच्या जगात लहान मुलांना वाचवणारा आणि धाडसाने परिस्थितीचा सामना करणारा अभिनेता म्हणून ते घरोघरी पोहोचले. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर त्यांनी या फ्रँचायझीच्या इतर भागांमध्येही काम केले होते.

50 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत

सॅम नील हे गेल्या 50 वर्षांपासून चित्रपट क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी केवळ ज्युरासिक पार्कच नाही, तर ‘द पियानो’ , ‘द हंट फॉर रेड ऑक्टोबर’, आणि लोकप्रिय ब्रिटिश क्राइम ड्रामा सीरिज ‘पिकी ब्लाइंडर्स’ मधील ‘चीफ इन्स्पेक्टर चेस्टर कॅम्पबेल’ यांसारख्या अनेक यादगार भूमिका साकारल्या.

चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली

हॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी आणि सहकलाकारांनी सॅम नील यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. “एक उत्तम अभिनेता आणि त्याहूनही उत्कृष्ट माणूस आज आपल्यातून गेला,” अशा भावना त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Comments are closed.