IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध कॅप्टन अय्यरकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! धोनीला टाकणार का मागे?

भारतीय क्रिकेट संघ (Indian cricket team vs Afghanistan) आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिका उद्यापासून म्हणजेच 13 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघांची तयारी पूर्ण झाली आहे. आता दोन्ही संघांना मैदानावर आपली ताकद दाखवावी लागणार असून 13 जून रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात टीम इंडिया अधिक दबावात असणार आहे. या मालिकेदरम्यान टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) स्वतःला सिद्ध करण्याची संधी असेल. जर त्याने ही संधी साधली, तर तो महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) मागे टाकू शकतो.
टीम इंडियाचा टी-20 कर्णधार श्रेयस अय्यरने आतापर्यंत 61 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 51 षटकार मारले आहेत. तर भारताचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 98 टी-20 सामन्यांमध्ये 52 षटकार मारले होते. त्यामुळे दिल्लीतील पहिल्या टी-20 सामन्यात श्रेयस अय्यरने 2 षटकार मारले, तर तो धोनीला मागे टाकेल. यासोबतच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो 13व्या स्थानावर पोहोचेल.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. मात्र, मागील 3 मालिकांमध्ये कर्णधार म्हणून त्याला केवळ 1 मालिकाच जिंकता आली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध मालिका जिंकून तो हा आकडा 2-2 असा करण्याच्या प्रयत्नात असेल. भारतीय मैदानावर कर्णधार म्हणून अय्यरचा हा पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे या खास सामन्यात चांगली कामगिरी करून त्याला टीम इंडियाला विजय मिळवून द्यावा लागेल.
खेळाडू म्हणून श्रेयस अय्यरवर फारसा दबाव नसणार आहे. मात्र, कर्णधार म्हणून त्याला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे अय्यरला आता प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागेल. त्याच्यासमोर पहिलं आव्हान असेल ते म्हणजे वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्यापैकी कोणत्या 2 खेळाडूंना अंतिम संघात संधी द्यायची.
अफगाणिस्तानविरुद्धची मालिका संपल्यानंतर टीम इंडिया एशियन गेम्स 2026 साठी जपानला रवाना होणार आहे. त्यामुळे या मालिकेदरम्यानही कर्णधार अय्यरला त्या स्पर्धेचा विचार करून निर्णय घ्यावे लागतील. एशियन गेम्स 2026 (Asian Games) मध्ये उतरताना टीम इंडिया पूर्णपणे तयार असावी, याचीही जबाबदारी त्याला घ्यावी लागेल. त्यामुळे उद्या टीम इंडिया कोणत्या रणनीतीसोबत मैदानात उतरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Comments are closed.