गिलकडून मोठी चूक! फक्त एक फोटो लीक झाल्यामुळे BCCIचं कोट्यवधींचं नुकसान! जाणून घ्या सविस्तर
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल इंग्लंड दौऱ्यावर आहे. शुबमन गिलने लीड्स आणि एजबॅस्टन कसोटीत एकत्रित 585 धावा केल्या आहेत. परंतु या सर्व गोष्टी असूनही शुबमन गिल वादात अडकला आहे. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी गिलने मोठी चूक केली, ज्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) कर्णधाराच्या चुकीचा सामना करावा लागू शकतो.
भारताच्या दुसऱ्या डावात शुबमन गिल डाव घोषित करण्यासाठी आला तेव्हा भारतीय कर्णधाराने काळ्या रंगाचा नाईक ब्रँडचा की बनियान घातला होता. पण बीसीसीआयचा करार नाईकसोबत नाही तर अॅडिडास कंपनीसोबत आहे. या कंपनीचा लोगो भारतीय खेळाडूंच्या जर्सीवरही छापलेला आहे. बीसीसीआय आणि अॅडिडास यांच्यातील करार मार्च 2028 पर्यंतचा आहे. हा जर्मन ब्रँड भारताच्या पुरुष, महिला आणि युवा संघांसाठी सर्व फॉरमॅटमध्ये किट तयार करतो. अॅडिडास ही बीसीसीआयची एक प्रमुख प्रायोजक कंपनी आहे.
बीसीसीआयची प्रायोजक कंपनी अॅडिडास आहे, मग संघातील खेळाडूंना या कंपनीची जर्सी घालण्याचा नियम लागू होतो, परंतु शुबमन गिलने हा नियम मोडला आहे. 2023 मध्ये अॅडिडास आणि बीसीसीआयमध्ये 250 कोटी रुपयांचा करार झाला होता. आता शुभमनच्या या चुकीवरती अॅडिडास काय ऍक्शन घेईल या बद्दल माहिती भेटलेली नाही. एकीकडे अॅडिडास देखील हा करार रद्द करू शकते, ज्यामुळे बीसीसीआयला कोट्यवधींचे नुकसान होईल. परंतु या कराराचा प्रायोजक कंपनीलाही खूप फायदा आहे. अशा परिस्थितीत, कंपनी बीसीसीआय आणि गिलला इशारा देखील देऊ शकते.
Comments are closed.