अखेर जान्हवीच्या कुटुंबाला न्याय मिळाला, अमेरिकेच्या प्रशासनाकडून 262 कोटींची नुकसानभरपाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेतील सिएटल शहरात पोलीस कारच्या धडकेत मृत्यू पावलेली 23 वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थिनी जान्हवी कंडुला हिच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळाला आहे. सिएटल प्रशासनाने जान्हवीच्या पुटुंबासोबत 29 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 262 कोटी रुपये) इतक्या विक्रमी रकमेचा समझोता (Settlement) केला आहे. 2023मध्ये रस्ता ओलांडताना वेगवान पोलीस वाहनाने जान्हवीला चिरडले होते.

जान्हवी कंडुला ही सिएटलमधील ईशान्य विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. 2023मध्ये रस्ता ओलांडत असताना अधिकारी केविन डेव्ह याच्या भरधाव पोलीस कारने तिला धडक दिली. ज्या ठिकाणी वाहनांचा वेग ताशी 40 किमी असणे आवश्यक होते, तिथे पोलीस अधिकारी 119 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवत होता. या भीषण अपघातात जान्हवीचा जागीच मृत्यू झाला होता. जान्हवीच्या मृत्यूनंतर सिएटल पोलीस दलातील दुसऱया एका अधिकाऱयाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा अधिकारी हसत जान्हवीच्या आयुष्याला मर्यादित मूल्य असे म्हणत होता आणि फक्त एक चेक लिहून विषय संपवा असे वक्तव्य करताना व्हिडिओमध्ये दिसला होता. हिंदुस्थानने या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी केली होती.

‘‘जान्हवी कंडुलाचा मृत्यू हृदयद्रावक होता आणि या आर्थिक समझोत्यामुळे कंडुला कुटुंबाला काही अंशी दिलासा मिळेल अशी शहर प्रशासनाला आशा आहे,’’ असे सिएटलच्या सिटी अॅटर्नी एरिका इव्हान्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ‘‘जान्हवीचे आयुष्य महत्त्वाचे होते. तिच्या पुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि समाजासाठी ती मौल्यवान होती,’’ अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

Comments are closed.