ज्योती मल्होत्राने घरात लिहून ठेवली होती चिठ्ठी; शेवटी ‘Love You अन् खुश-मुश’, पोलिसांना काय मि

ज्योती मल्होत्रा: यूट्युबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) हिच्या गद्दारीचे एकेक पुरावे रोज समोर येत आहेत. त्यात आणखी एक संतापजनक प्रकार समोर आलाय. ज्योती आणि आयएसआय अधिकारी अली हसन यांच्यातलं एक व्हॉट्सअॅप चॅट समोर आलंय. त्यात अटारीवर एखाद्या अंडर कव्हर एजंटबाबत माहिती काढण्याचं काम ज्योतीवर आयएसआयने सोपवलं होतं हे दिसून येतंय. अंडर कव्हर एजंटला भूलवून त्याला एका गुरूद्वारात नेण्याचे आदेश अली हसन ज्योतीला देत असल्याचं या चॅटमधून उघड होतंय. पाकिस्तानी आयएसआय ही संघटना ज्योतीचा वापर भारतीय गुप्तहेरांची माहिती काढण्यासाठी करत असल्याचे हे पुरावे आहेत.

ज्योती मल्होत्राने घरात लिहिली होती एक चिठ्ठी-

ज्योती मल्होत्रा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस रविवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास तिला घरात घेऊन गेले होते. यावेळी ज्योतीने घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी तिने घरातील मोलकरणीला लिहिली होती. ‘सविता को कहना फ्रूट ला दे। घर का ख्याल रखे, मैं जल्दी जाऊंगी।’ असं ज्योतीने या चिठ्ठीत लिहिलं होतं. तसंच एका औषधाचं आणि डॉक्टरचं नाव आणि शेवटी लव यू.. खुश-मुश, असं लिहिलं आहे.

पाकिस्तानसह चीनलाही जाऊन आलीय ज्योती मल्होत्रा-

हेरगिरी प्रकरणातील आरोपी ज्योती मल्होत्राच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्यूएन्झर्सशीही संपर्क असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्योतीची यूट्यूबर मैत्रीण प्रियांकाचीही ओडिशातील पुरीत कसून चौकशी सुरु आहे. कुरूक्षेत्र भागातील एकाने ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिली. तर  इतर इन्फ्ल्यूएन्झर्सशी संपर्कासाठी पाकिस्तानी ज्योतीला वापरत होते. तसेच पाकिस्तानसह चीनलाही ज्योती मल्होत्रा जाऊन आली आहे.

कोण आहे ज्योती मल्होत्रा?

ज्योती मल्होत्रा ही एक भारतीय युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. ज्योतीने आपल्या करिअरची सुरुवात रिसेप्शनिस्ट आणि शिक्षिका म्हणून केली. ज्योतीनेनंतर तिने ट्रॅव्हल ब्लॉगिंगमध्ये प्रवेश केला आणि “Travel with Jo” या युट्यूब चॅनेलवर विविध देशांतील प्रवासाचे व्हिडीओ शेअर करू लागली. तिच्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानातील पर्यटन स्थळांची माहिती आणि त्या देशाच्या बाजूने विचार मांडले जात होते. या माध्यमातून तीने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. ज्योतीच्या युट्यूब चॅनेलमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची चौकशी सुरू आहे. अहवालानुसार, तिची एकूण संपत्ती लाखो रुपयांमध्ये असून, ती विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय आहे. तिच्या आर्थिक व्यवहारांबद्दल सुरक्षा यंत्रणा सखोल तपास करत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=cwlgvyzjoc

संबंधित बातमी:

Jyoti Malhotra: ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी बनली होती ॲसेट; चीनसाठीही हेरगिरी?, नवीन कनेक्शन समोर

अधिक पाहा..

Comments are closed.