हॉटेलमध्ये सिगारेट ओढताना रबाडाचा व्हिडिओ व्हायरल! गुजरात कॅम्पमध्ये खळबळ, फॅन्समध्ये चर्चा जोरात
आयपीएल 2026 सुरू असताना गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रबाडासारखा दिसणारा एक व्यक्ती हॉटेलमध्ये धूम्रपान करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता अद्याप सिद्ध झालेली नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती धूम्रपान करताना दिसते. हा व्हिडिओ गुजरात टायटन्सच्या संघाच्या हॉटेलपाशी चित्रित करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु, या व्हिडिओचे नेमके ठिकाण आणि वेळ याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या इतर व्यक्तींची ओळखही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाबाबत अनिश्चितता कायम आहे.दरम्यान, रबाडा यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्ससाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे.
पर्पल कॅपच्या शर्यतीत तो सध्या सातव्या क्रमांकावर असून सहा सामन्यांत त्याने दहा विकेट घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजी सरासरी 22.20 असून इकॉनॉमी दर 9.73 इतका आहे.या व्हिडिओनंतर रबाडाच्या जुन्या शिस्तभंगाच्या प्रकरणाचीही चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. मागील आयपीएल हंगामात त्याला दक्षिण आफ्रिकेतील डोपिंगविरोधी संस्थेकडून एका महिन्याची बंदी घालण्यात आली होती. त्या काळात त्याने स्पर्धा अर्धवट सोडली होती आणि नंतर संघात पुनरागमन केले होते.
मात्र, त्या प्रकरणाची सविस्तर माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नव्हती.सध्या गुजरात टायटन्स गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर असून बाद फेरीच्या शर्यतीत टिकून आहे. 24 एप्रिल रोजी बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवत संघ आपली स्थिती अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.
यापूर्वीही अशाच प्रकारचा एक व्हिडिओ एका भारतीय फिरकीपटूबाबत व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओचीही पुष्टी झालेली नव्हती. त्यामुळे समाजमाध्यमांवरील अशा दाव्यांकडे सावधपणे पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.