कैलास मानसरोवर यात्रा सुरू

44 यात्रेकरूंची पहिली तुकडी नाथू ला खिंडीतून चीनमध्ये दाखल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2026 च्या कैलाश मानसरोवर यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीने शनिवारी भारत-चीन सीमेवरील नाथू ला खिंडीतून चीनमध्ये प्रवेश केला. शनिवारपासून त्यांच्या पवित्र कैलाश मानसरोवरच्या पुढील प्रवासाला सुरुवात झाली. या पहिल्या तुकडीत 44 यात्रेकरूंचा समावेश आहे. त्यांच्यासोबत चार संपर्क अधिकारी आणि एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे. पहिल्या तुकडीमध्ये 32 पुरुष आणि 12 महिला असून, ते बिहार, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओडिशा यांसारख्या विविध राज्यांतील आहेत. परराष्ट्र मंत्रालय दरवर्षी जून ते ऑगस्ट/सप्टेंबर या कालावधीत लिपुलेख पास (उत्तराखंड) आणि नाथू ला पास (सिक्कीम) या दोन वेगवेगळ्या मार्गांनी कैलास मानसरोवर यात्रेचे आयोजन करते.

Comments are closed.