Crime news – कल्याणमध्ये राडा; पोलिसांनाही धक्काबुक्की

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कल्याण पूर्व येथील १०० फूट रोड परिसरात दोन बाईकस्वारांनी एकमेकांना हुलकावणी दाखवल्याने तुफान राडा झाल्याची घटना घाडली आहे. दोन्ही दुचाकीस्वारांनी आपापल्या साथीदारांना बोलावल्यानंतर जोरदार हाणामारी झाली. एकमेकांना अर्वाच्च शिवीगाळ करत दोन्ही गट भिडले. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनाही या टोळक्याने धक्काबुक्की केली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१०० फूट रोड परिसरात दोन दुचाकीस्वारांनी एकमेकांना हुलकावणी दाखवली. त्यानंतर वाहनचालकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. काही वेळातच या वादाने उग्र रूप धारण केले. दोन्ही बाजूंचे समर्थक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले आणि भररस्त्यात एकमेकांवर तुटून पडले. शिवीगाळ, लाथाबुक्क्यांसह जोरदार मारामारी झाल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या प्रकारामुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाली आणि वाहतुकीचा खोळंबा झाला. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असताना काही तरुणांनी पोलि सांशीही धक्काबुक्की केली.

पोलिसांचा बीपी वाढला

हाणामारीत दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच या गोंधळादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याचा रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तत्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Comments are closed.