दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून शेजाऱ्याच्या घरात घुसून मारहाण, लाकडी दांडक्याचा प्रहार
कल्याण क्राइम न्यूज: दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून शेजाऱ्यांशी वाद घातला. हा वाद इतका टोकाला गेला की संतापलेल्या बाप लेकाने आपल्या साथीदारांसह दारूचे पैसे न देणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या पत्नीसह 19 वर्षीय मुलीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात एका 19 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सानिया सय्यद असे मृत मुलीचे नाव आहे .कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुलाम शेख उर्फ मुन्ना शेख त्याचा मुलगा अब्दुल शेख आणि त्याचे सहकारी शोएब शेख, अजिज शेख, शाहिद शेख या पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. (Crime News)
नक्की झाले काय?
कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद हे आपल्या पत्नी व मुलीसह राहतात.निसार सय्यद हे भाजी विक्रीचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास (5 एप्रिल) घरी जेवत असताना याच परिसरात राहणारा गुलाम शेख हा त्यांच्या घरी आला. त्याने त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. निसार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने या दोघांमध्ये वाद झाला . थोड्याच वेळात गुलाम शेखचा मुलगा अब्दुल शेख व त्याचे साथीदार शोएब शेख, अजिज शेख आणि शाहिद शेख यांनी सय्यद कुटुंबाच्या घरात घुसून निसार सय्यद यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या पत्नी आणि मुलगी सानिया यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की केली. यादरम्यान अब्दुल शेख याने लाकडी दांडक्याने सानिया हिच्या डोक्यावर वार केला. गंभीर जखमी सानियाचा काही वेळातच मृत्यू झाला.
या प्रकरणात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये गुलाम शेख उर्फ मुन्ना शेख, त्याचा मुलगा अब्दुल शेख, शोएब शेख, अजिज शेख आणि शाहिद शेख यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा:
https://www.youtube.com/watch?v= pdpj_rdzovy
अधिक पाहा..
Comments are closed.