Kalyan Crime small girl rape murder case accused vishal gawli supporter threatned in marathi


कल्याण : गेल्या वर्षी बदलापूरमध्ये एका शाळेत झालेल्या दोन लहान मुलींवरील अत्याचार प्रकरण तसेच कल्याणमध्ये झालेल्या लहान मुलीवर झालेले अत्याचार आणि हत्या प्रकरण चांगलेच गाजले होते. कल्याण पूर्वमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी विशाल गवळी याला अटक करण्यात आली होती. त्याच्यासह त्याची पत्नी साक्षीलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या तीन भावांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. अशामध्ये रविवारी (2 फेब्रुवारी) मध्यरात्री पीडित मुलीच्या घराबाहेर तीन तरुणांनी दारू पिऊन धिंगाणा घातल्याचे समोर आले. यावेळी त्यांनी दहशत पसरवण्याचे काम केले. (Kalyan Crime small girl rape murder case accused vishal gawli supporter threatned)

हेही वाचा : Shivraj Rakshe : ‘शिवराज पराभूत झाल्याचे सिद्ध झाल्यास एक कोटींचे बक्षीस देणार,’ कोणी दिले आव्हान? 

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या घराबाहेर दहशत माजवणाऱ्या तरुणांनी ‘आमच्या जामीन झाला नाही, तर एके-47 घेऊन येतो आणि तुम्हाला दाखवतो,’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. यानंतर पीडित मुलीच्या आई वडिलांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घडलेल्या प्रकारानंतर पीडित कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तीन तरूण एका दुचाकीवरून पीडित कुटुंबीयांच्या चक्कीनाका येथील घरासमोर आले. त्यांनी पीडित कुटुंबीयांच्या घरासमोर धिंगाणा घातला. शिवीगाळ करत दगडी फेकल्या आणि काही खिळे प्रवेशव्दाराच्या बाजुला ठोकण्याचा प्रयत्न केला, भाजीचे ट्रे फेकून दिल्याची माहिती एका सदस्याने माध्यमांना दिली.

कल्याण पूर्व भागात गेल्या वर्षी 23 डिसेंबर रोजी आरोपी विशाल गवळीने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केली होती. यानंतर विशाल गवळी फरार झाला होता. विशालने त्याच्या पत्नीसह मिळून मुलीचा मृतदेह मृतदेह बापगाव परिसरात फेकला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात विशाल आणि त्याच्या पत्नीला अटक केली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपी गवळीच्या तीन भावांना पोलिसांनी तडीपार केले आहे. दरम्यान, पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण, आता पोलीस बंदोबस्त नाही. आम्हाला पुरेसा पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी केली आहे.



Source link

Comments are closed.