गाववाल्यावर हात उचलतोस का, आता दाखवतोच तुला! कल्याणमध्ये वाहतूक पोलिसाची कॉलर पकडली, डोक्यात दग
कल्याण गुन्हा: वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावर गोंधळ उडालेला असतानाच कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वाहतूक पोलीस हवालदाराने नियमभंग करणाऱ्या तरुणाला हटकताच, त्या तरुणाने रागाच्या भरात पोलिसाला अश्लील शिवीगाळ केली, कॉलर पकडली आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात अर्धा तास गोंधळाचं वातावरण होतं. आता या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Traffic Police Kalyan)
नेमकं काय घडलं?
कल्याणच्या शहाड उड्डाण पुलाजवळ वाहतूक कोंडीदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस हवालदाराला एका तरुणाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
शहाड-अहिल्यानगर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली असताना, पोलीस हवालदार सचिन ओंबासे वाहतूक सुरळीत करण्याचं काम करत होते. त्याच वेळी मयूर केणे नावाचा तरुण विरुद्ध दिशेने मोटरसायकल चालवत शहाडकडे जात होता. पोलिसांनी त्याला थांबवत बाजूने जाण्याचा सल्ला दिला. मात्र या छोट्याशा कारणावरून तरुण संतापला. रागाच्या भरात मयूरने पोलीस हवालदार सचिन ओंबासे यांची कॉलर पकडली, त्यांना ढकललं आणि शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. “तू गाववाल्यावर हात उचलतोस, तुला बघून घेतो…” असे म्हणत त्याने अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, मयूरने डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्नही केला.
हा राडा तब्बल अर्धा तास सुरू होता. अखेर आजूबाजूच्या वाहनचालकांनी हस्तक्षेप करत दोघांना वेगळं केलं आणि वातावरण शांत केलं. या घटनेनंतर कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात मयूर केणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
तरुणाकडून 20 हजार उकळले, पुण्यातील दोन पोलीस निलंबित
विधी महाविद्यालय रस्त्यावरील दामले पथ परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास तरुण त्याच्या मैत्रिणीसमवेत कारमध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी गणेश देसाई व योगेश सुतार हे रात्रगस्तीवर होते. ते दोघेही तेथे आले. त्यांनी तरुणाला तुमच्याबद्दल तक्रार आली आहे,पोलिस ठाण्यात प्रकरण न्यायचे नसेल तर 20 हजार रुपये दे, अशी मागणी केली. तरुणाजवळ सहाजिक एवढे पैसे नव्हते. तर पोलिस कर्मचाऱ्यांनी तरुणास दुचाकीवर बसवून कमला नेहरू पार्क परिसरातील एटीएममध्ये नेले. तेथे त्याच्याकडून 20 हजार रुपये काढून घेतले.
https://www.youtube.com/watch?v=F_H5S7LI2AG
आणखी वाचा
Comments are closed.