लोकलमध्ये केस ओढत महिलांची तरुणीला मारहाण; जबरदस्तीने खाली ढकलले
लोकलमध्ये एका तरुणीला काही महिला प्रवाशांनी केस ओढत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणहून बदलापूरकडे जाणाऱ्या लोकलमध्ये हा प्रकार घडला असून व्हिडीओमध्ये संबंधित महिलांनी तरुणीचे केस ओढत तिला मारहाण केली तसेच जबरदस्तीने डब्यातून खाली ढकलून दिले. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
कल्याण स्थानकावरून लोकल सुटत असताना संबंधित तरुणी गाडीत चढत होती. यावेळी डब्यातील काही महिलांशी तिचा वाद झाला. त्यानंतर तीन ते चार महिलांनी तिच्यावर हल्ला केला. व्हिडीओमध्ये संबंधित महिलांनी तरुणीचे केस ओढत तिला मारहाण केली तसेच जबरदस्तीने डब्यातून खाली उतरवण्यात आले. व्हिडीओमध्ये महिला प्रवाशांची दादागिरी स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेनंतर महिलांच्या डब्यातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मारकुट्या महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू
लोकलमध्ये किरकोळ कारणांवरून होणारे वाद मारहाणीपर्यंत पोहोचत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. मध्य रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित महिलांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध कारवाई
Comments are closed.