कॅन्सरशी झुंज देणाऱ्या तरुणीला शिवसेनेचा मदतीचा हात

कल्याण येथील एक ३६ वर्षीय तरुणी कॅन्सरशी झगडत आहे. बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने महागडे उपचार करताना कुटुंबाची ओढाताण होत आहे. याबाबतची माहिती समजताच शिव आरोग्य सेनेने पीडित कुटुंबाची भेट घेऊन कॅन्सरशी झुंज देणाऱ्या तरुणीच्या उपचारासाठी मदतीचा हात दिला. धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान यांच्या मार्फत आर्थिक तसेच शिव आरोग्य सेनेमार्फत औषधांची मदत करण्यात आली.

कॅन्सरग्रस्त तरुणीला कल्याण येथील साई संजिवनी क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल केले आहे. ही माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना समजताच त्यांनी रुग्ण तरुणीला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला. यानंतर शिव आरोग्य सेनेचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, राज्य सरचिटणीस जितेंद्र सकपाळ यांच्या मार्गदर्शनाने ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ. प्रशांत भुईंबर, ठाणे जिल्हा समन्वयक एकनाथ अहिरे, कल्याण जिल्हा सहसमन्वयक अजित माने, कल्याण ग्रामीण विभागीय समन्वयक संजय निकम, नितीन सावंत, राजेंद्र शिसैकर तसेच शाखाप्रमुख भास्कर शिर्के यांनी ताबडतोब रुग्णालयात जाऊन रुग्ण तरुणीच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच लागलीच रुग्णास आर्थिक तसेच औषधांच्या स्वरूपात मदत करून पुढील उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. या मदतीबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवसेनेचे आभार मानले.

Comments are closed.