Kalyan News – खाजगी रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

कल्याणमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल झा असे आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नांदिवलीतील एका खासगी रुग्णालयात पीडित तरुणी ही रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. गोपाल झा हा परप्रांतीय तरुण डॉक्टरांना भेटायला आला होता. यावेळी डॉक्टरांच्या केबिनमध्ये आधीच एमआर बसले होते. त्यामुळे डॉक्टरकडे एमआर बसले आहेत, तुम्ही जरा थांबा असे तरुणी आरोपीला बोलली. यानंतर गोपालने तिच्याशी वाद घालायला सुरवात केली.

यानंतर तरुणीच्या अंगावर धावून येत तिला लाथ मारली. यामुळे तरुणी खाली पडली. आरोपीने तिचे बखोट पकडलं आणि केसांना धरून तिला फरफटत नेत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी मानपाडा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Comments are closed.