कल्याण रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला माथेफिरु, रेल्वे वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कल्याण रेल्वे स्थानकावर आज एका माथेफिरुने ओव्हरहेड इक्विपमेंट खांबावर चढून हाय-व्होल्टेज ड्रामा केल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 1A आणि 2 ला वीजपुरवठा करणाऱ्या खांबावर हा माथेफिरु चढल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून ठाकुर्ली आणि आंबिवली दरम्यानची ‘डाऊन लोकल’ लाईन तात्काळ बंद करण्यात आली.

या तांत्रिक निर्णयामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला असून, 2 मेल-एक्स्प्रेस आणि 3 लोकल गाड्या विविध ठिकाणी खोळंबल्या आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, रेल्वे पोलीस आणि संबंधित यंत्रणेकडून या व्यक्तीला सुरक्षितपणे खाली उतरवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

Comments are closed.