हे गैरवर्तन देशासाठी लज्जास्पद, सरन्यायाधीशांवरील बूटफेकीवर कमलताई गवईंची संतप्त प्रतिक्रिया

सरन्यायाधीश ग्रेस गवई यांच्यावर सर्वोच्च कोर्टात झालेल्या बूटफेकीच्या प्रयत्नाचा त्यांच्या मी कमलताई गवई यांनी तीव्र शब्दांत निषेध केला? ''देशाची राज्यघटना सर्वांना तत्सम संधी द्या? जागे व्हा आणि जगू द्या हा घटनेचा गाभा आहे? फक्त काही लोक कायदा हाती घेऊन जे गैरवर्तन करतात, ते देशासाठी लाजिरवाणे आहे'' असे कमलताई म्हणाल्या?

कमलताई पीटीआयशी बोलत होत्या. ‘‘कायदा हाती घेऊन गैरवर्तन करण्याचा अधिकार कोणालाही नाही. यातून देशात अराजकता माजू शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसमावेशक राज्यघटना देशाला दिली आहे. ही राज्यघटना सर्वांना समान संधी देते. प्रत्येकाला आपले प्रश्न सनदशीर मार्गाने व शांततेने मांडण्याचा अधिकार आहे. त्याच पद्धतीने ते मांडावेत,’’ असे आवाहन त्यांनी केले.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने नोंदवला निषेध

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याच्या घटनेचा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या महान सुपुत्राचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा ठरावच कौन्सिलने केला आहे.

या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सोमवारीच कौन्सिलची तातडीची बैठक झाली. बैठकीत या घटनेच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर झाला. या निषेध ठरावाची प्रत सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांनाही धाडण्यात आली आहे. महाराष्ट्र व गोवामधील सर्व सलग्न बार असोसिएशनने अशाच प्रकारचा ठराव केला असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. या बैठकीला कौन्सिलचे अध्यक्ष अमोल सावंत यांच्यासह ऍड. डॉ. उदय वारुंजीकर व सर्व पदाधिकारी वकील उपस्थित होते, अशी माहिती माजी अध्यक्ष ऍड. विठ्ठल कोंडे-देशमुख यांनी दिली.

सरन्यायाधीशांवरील हल्ला पूर्णपणे अस्वीकार्य आहे. या घटनेमुळे सुसंस्कृत आणि व्यावसायिक कायदेशीर वातावरणात अपेक्षित असलेल्या प्रतिष्ठsचे, शिष्टाचाराचे तसेच गांभीर्याचे घोर उल्लंघन झाले आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य या निंदनीय कृत्याबद्दल स्पष्ट नापसंती आणि खोलवर खेद व्यक्त करत आहेत. असे वर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा ठराव एकमताने मंजूर केला जात आहे, असा निर्णय कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.

राकेश किशोरवर कायदेशीर कारवाई करा

z सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या राकेश किशोरवर कायदेशीर कारवाई करण्याचा ठरावदेखील कौन्सिलच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

मुंबईत काँग्रेसचे धरणे आंदोलन

सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा उघड प्रकार आहे. या हल्लेखोरावर रासुका कायद्याखाली कारवाई करा, अशी मागणी करत मुंबई कॉँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात कॉँग्रेसने धरणे आंदोलन करत सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. कॉँग्रेसच्या मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या हल्ल्याच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित वकिलावर कठोर कारवाई करावी. तसेच हल्ल्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट प्रसारित करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी कॉँग्रेसचे वरिष्ठ प्रवत्ते सचिन सावंत, सुरेशचंद्र राजहंस, क्लाइव्ह डायस आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे बारामती, छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. बारामतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीच्या नेत्या-खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मूक, मौन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात युगेंद्र पवार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार रोहित पवार यांच्या उपस्थित आंदोलन करण्यात आले.

कोल्हापुरात भारत आघाडीची निदर्शने

कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने ांशिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. मोदी सरकार चले जाओ, हल्ला करणाऱ्या मनुवादी विचारसरणीचा धिक्कार असो, अशा घोषणांनी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

म्हणाला, परमात्म्याने करून घेतले! हल्लेखोर वकिलाच्या उलटय़ा बोंबा

‘‘जे झाले त्याबद्दल मला कुठलाही पश्चात्ताप नाही. माझ्याकडून हे परमात्म्याने करून घेतले. त्यात माझा काहीच रोल नव्हता. मी केवळ निमित्त होतो,’’ अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीशांवर बूटफेकीचा प्रयत्न करणारा वकील राकेश किशोर तिवारी याने आज दिली.

गवई यांनी 16 सप्टेंबर रोजी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सनातन धर्माची थट्टा केली होती. त्यानंतर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. त्यामुळे आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र तीन दिवसांपूर्वी त्यांनी मॉरिशसमध्ये एक वक्तव्य केले की बुलडोझरने देश चालणार नाही. त्यांचा रोख योगी सरकारवर होता, मात्र बुलडोझर कारवाई का होतेय ते मला चांगले माहीत आहे. मला त्यांचे हे वक्तव्यही खटकले होते, असे तिवारी म्हणाला.

Comments are closed.