ICC ची ट्रॉफी चोरुन आणायची का?; पाकिस्तानच्या माजी खेळाडूने सुनावलं, कधीही न बोललेले शब्द बोलून

पाकिस्तान संघात कामरान अकमल: टी-20 वर्ल्ड कपनंतर बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत पाकिस्तानला 2-1 (Bangladesh Beats Pakistan) असा पराभव स्वीकारावा लागला. ज्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. माजी दिग्गज खेळाडू कामरान अकमल (Kamran Akmal) याने संघाच्या खराब कामगिरीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. शाहीन शाह आफ्रिदीच्या (Shaheen Afridi) नेतृत्वाखालील पाकिस्तानला रविवारी ढाका येथे झालेल्या निर्णायक सामन्यात 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह बांगलादेशने मालिका 2-1 अशी जिंकली. या सामन्यात बाबर आझम (Babar Azam) आणि फखर जमान (Fakhar Zaman) यांसारख्या अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूंनाही संधी होती, पण दबावाच्या क्षणी कोणीही अपेक्षित कामगिरी करू शकले नाही.

PCB वर कारवाई का होत नाही?

पाकिस्तानच्या पराभवानंतर कामरान अकमल याने तीव्र प्रतिक्रिया देत प्रश्न उपस्थित केला की, इतक्या खराब कामगिरीनंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) मधील कोणावरही कारवाई का होत नाही? त्याने म्हटले, “आपली टीम अशी खेळत असेल तर नेदरलँड्ससारखी टीमही आपल्याला हरवू शकते. पाकिस्तान क्रिकेटची अवस्था इतकी खालावली आहे की हे समजण्यापलीकडचे आहे. जर आपण द्विपक्षीय मालिकादेखील जिंकू शकत नाही, तर मग आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न कसे पूर्ण करणार?”

एका कार्यक्रमात बोलताना अकमल म्हणाला की, “थोडा तरी पाकिस्तान क्रिकेटबद्दल विचार करा. आपण किती खालच्या पातळीवर आलो आहोत ते पाहा. सगळं एखाद्या कॉमेडी सीरियलसारखं वाटत आहे. नेदरलँड्सलाही वाटत असेल की पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची मालिका मिळाली तर तेही आम्हाला हरवू शकतात. आपण आपल्या क्रिकेटची थट्टा करून ठेवली आहे.”

ICC ट्रॉफी चोरी करून आणायची का?

अकमल याने संघाच्या रणनीतीवरही प्रश्न उपस्थित केले. तो पुढे म्हणाला की, “तुम्ही सामना हरलात. कसले प्रयोग करत आहात? पिच चांगली होती, तरी तुम्ही गोलंदाजी का निवडली? फलंदाजी केली असती तर कदाचित 350 धावा झाल्या असत्या. हा निर्णायक सामना होता. जर अशा मालिकाही जिंकता येत नसतील, तर पुढे कसे जाणार? ICC ट्रॉफी चोरी करून आणायची आहे का?”

T20 वर्ल्ड कपनंतर आणखी एक धक्का

बांगलादेशविरुद्ध मालिका गमावण्यापूर्वी पाकिस्तानची कामगिरी आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक मध्येही निराशाजनक होती. पाकिस्तान संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. ग्रुप स्टेजमध्ये त्यांना टीम इंडियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर सुपर-8 फेरीत इंग्लंडकडूनही पराभव झाला. न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर शेवटच्या सामन्यात श्रीलंकाकडून पराभव झाल्याने पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

हे ही वाचा –

BAN vs PAK 3rd ODI : 11 वर्षांनंतर मानहानीकारक पराभव अन् पाकिस्तानचे रडगाणे सुरू… थेट ICC कडे तक्रार, शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.