डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कंगनाची बोचरी टीका; जेपी नड्डांचा फोन येताच ‘ट्विट क्विक डिलीट’

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान (पाकिस्तान) यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत आपण मध्यस्थी केल्याने दोन्ही देशांनी शस्त्रसंधी कायम ठेवल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामाची घोषणा देखील ट्रम्प यांनीच सर्वप्रथम केली. त्यामुळे, विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका होऊ लागली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भांडणात अमेरिकेचा दबाव का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. त्यातच, आपण व्यापार बंद करण्याचा इशारा देत दोन्ही देशांना शस्त्रसंधीचा आग्रह केला, त्यांनी तो मानला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद असेही ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यातच, आज कतार येथील उद्योजकांच्या परिषदेत ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टीम कुक यांना फुकटचा सल्ला दिला होता. भारतात आयफोन उत्पादनाच्या कंपन्या नको, ते सक्षम आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यानंतर, पुन्हा ट्रम्प यांच्यावर भारतीयांनी नाराजी व्यक्त केली. अभिनेत्री आणि खासदार कंगना राणुती (कंगना रनौत) त्याच अनुषंगाने ट्विट करत ट्रम्प यांच्यापेक्षा मोदीच भारी असल्याचं म्हटलं होतं.

Apple कंपनीचे CEO टिम कुक यांना भारतात कारखाने उभारू नयेत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं. कतारमध्ये झालेल्या भेटीत ट्रम्प यांनी कुक यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत ही माहिती दिली. “माझं टिम कुकसोबत बोलणं झालं. ते भारतात सर्वत्र कारखाने उभारत आहेत. मी त्यांना स्पष्ट सांगितलं – मला भारतात काहीही नकोय,” असं ट्रम्प यांनी म्हटलं. या चर्चेनंतर Apple अमेरिकेत उत्पादन वाढवणार असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. त्यामुळे, भारतीयांना नाराजी व्यक्त करत, ट्रम्प यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली. सोशल मीडियातून पुन्हा डोनाल्ड ट्रम्प ट्रोल होऊ लागले होते. त्यातच, कंगना रणौतनेही ट्विट करत ट्रम्प यांच्यावर बोचरी टीका केली होती. ट्रम्प हे लिजेंड असतील, पण मोदी हे लिजेंडचे बाप आहेत असे कंगनाने म्हटले होते. त्यानंतर, भाजपा पक्षाच्या अध्यक्षांच्या सूचनेवरुन कंगनाने आपले ट्विट डिलिट केलं आहे.

माझे जे वैयक्तिक मत मी व्यक्त केलं होतं, त्याबद्दल मला खेद आहे. दरम्यान, वरिष्ठांच्या सूचनांनुसार मी माझे मत लगेच ट्विटर आणि इंस्टाग्रामवरून देखील हटवले आहे. धन्यवाद.. असे कंगना रणौतने म्हटले आहे. दरम्यान, कंगना रणौत अभिनेत्री आणि खासदार देखील आहेत.

काय केले होते ट्विट

कंगनाने अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासंदर्भाने ट्विट केले होते. ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ यांना भारतात कंपन्या न उभ्या करण्याचा सल्ला दिला होता. त्यावरुन पुन्हा एकदा भारतीय नागरिकांनी आणि भाजप समर्थकांनी ट्रम्प यांच्याबद्दल नाराजी उघड केली आहे. कंगना रणौतनेही त्याच अनुषंगाने ट्विट करुन ट्रम्प यांच्यावर बोचरी टीक केली होती.

हे प्रेम कमी होण्याचं काय कारण असू शकतं?
ते अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, पण जगातील सर्वात लोकप्रिय नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.
ट्रम्प यांची ही दुसरी टर्म आहे, तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान आहेत.
ट्रम्प जरी लिजेंड असले तरी नरेंद्र मोदी हे लिजेंडचे बाप आहेत, यात शंकाच नाही
तुम्हाला काय वाटत?
ही तुमची जळाऊ वृत्ती आहे की, डिप्लोमॅटीक असुरक्षितता?

असा सवाल कंगनाने ट्विटमधून विचारला होता. त्यानंतर, कंगनाचे हे ट्विट चांगलंच व्हायरल झाला असून भाजप नेतृत्वानेदेखील या ट्विटची दखल घेतली. त्यानंतर, कंगनाने हे ट्विट डिलिट केलं आहे. स्वत: कंगनाने याबाबत माहिती दिली असून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सूचनेनंतर मी माझं ट्विट डिलिट करत असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा

धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, नांदेडमध्ये शिक्षकाचा जागीच मृत्यू; पोलिसांची घटनास्थळी धाव

अधिक पाहा..

Comments are closed.