प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्यानंच रचला अपहरणाचा कट; मुलीच्या कस्टडीसाठी केलं होत्याचं नव्हतं

कन्नड अभिनेत्री चैत्रा हिचे पतीने कथितपणे अपहरण केले आहे. टेलिव्हिजन विश्वातली सुप्रसिद्ध अभिनेत्री चैत्रा (Actress Chaitra) हिचं तिच्या पतीनंच अपहरण केल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. यामागील कारण म्हणजे, जोडप्याची एक वर्षांची मुलगी आहे, असंही सांगितलं जात आहे. अभिनेत्रीची बहीण लीला आर. यांनी यासंदर्भात एक तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जोडप्यात मतभेद होते, ज्यामुळे ते वेगळे झाले. कन्नड अभिनेत्रीचा (Kannada Serials) वेगळा झालेला पती हर्षवर्धन ‘हसन’मध्ये राहत होता. तर त्याची पत्नी त्यांच्या एका वर्षाच्या मुलीसह मगडी रोडवरील एका भाड्याच्या घरात राहत होती. अभिनेत तिचा ताबा हवा होता. जेव्हा त्याला तो मिळाला नाही, तेव्हा त्याने ही युक्ती अवलंबली.

चैत्रा आणि हर्षवर्धन यांचं 2023 मध्ये लग्न झालेलं. दरम्यान, त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्यामुळे ते वेगळे राहू लागले. तिनं मालिकेत काम सुरू ठेवलं. 7 डिसेंबर रोजी तिनं कुटुंबाला सांगितलं की, ती मैसूरला शूटिंगसाठी जातेय. दरम्यान, तक्रारीनुसार, तिचं तिथे जाणं हा हर्षवर्धनच्याच कटाचा भाग होता.

अभिनेत्रीच्या पतीचं म्हणणं काय?

कन्नड अभिनेत्री चैत्रानं पती हर्षवर्धननं आरोप लावलाय की, त्यानं त्याच्या एसोसिएटला 20 हजार रुपये अॅडव्हान्स दिलेले आणि एका दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीनं चैत्राला सकाळी 8 वाजता म्हैसूर रोडवरच्या मेट्रो स्टेशनवर बोलावलेलं. तिथून अभिनेत्रीला जबरदस्तीनं नाईस रोड आणि बिदादी मार्गाहून कारमधून घेऊन गेले.

पत्नीला किडनॅप करुन दिलं अल्टीमेटम

तक्रारीनुसार, सकाळी 10.30 वाजता चैत्रानं कथितपणे आपला मित्र गिरीशला अलर्ट केलं, त्यानं चैत्राच्या कुटुंबीयांना तिचं अपहरण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर चैत्राचा पती हर्षवर्धननं कथितपणे चैत्राची आई सिद्धम्माला फोन केला. आपणंच चैत्राचं अपहरण केल्याचं सांगितलं आणि अल्टीमेटम दिला की, मुलाला तो सांगेल त्या ठिकाणी आणून त्याच्या ताब्यात द्या नाहीतर चैत्राला सोडणार नाही.

अभिनेत्रीच्या बहिणीच्या सांगण्यावरुन तक्रार दाखल

अभिनेत्रीचा पती हर्षवर्धननं एका दुसऱ्या नातेवाईकाशी बातचित केली आणि मुलाला ठरलेल्या ठिकाणी आणायला सांगितलं. त्यासोबतच मुल सुखरुप पोहोचल्यानंतर चैत्रालाही सुखरुप सोडणार असल्याचं सांगितलं. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर अभिनेत्रीच्या बहिणीनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर खटला दाखल करण्यात आला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mahie Gill Struggle Story: बालवयात लग्न, नंतर काही वर्षांतच घटस्फोट; चाळीशीत झाली बिनलग्नाची आई, वयाच्या 47व्या वर्षी बोहोल्यावर चढली ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री

आणखी वाचा

Comments are closed.