विधानसभेत कंवरलाल मीना यांचे सदस्यत्व संपुष्टात आले आहे.
जयपूर : राजस्थानच्या बारां जिल्ह्यातील अंता मतदारसंघाचे भाजप आमदार कंवरलाल मीणा यांचे विधानसभा सदस्यत्व अखेर रद्द झाले आहे. राजस्थान विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी यांनी यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. कंवरलाल मीणा यांना 20 वर्षे जुन्या गुन्हेगारी खटल्याप्रकरणी 3 वर्षांची शिक्षा झाली होती. तर दोन दिवसांपूर्वी मीणा यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.
Comments are closed.