करमाळी एक्स्प्रेसची धाव ठाण्यापर्यंतच, प्रवाशांना मनस्ताप

कोकणात ये-जा करणाऱया प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. गुरुवारी करमाळीतून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रवाना झालेल्या करमाळी-सीएसएमटी एक्स्प्रेसचा प्रवास शुक्रवारी पहाटे अचानक ठाणे स्थानकात समाप्त करण्यात आला. प्रवाशांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच प्रवाशांना ठाण्यात उतरवण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

करमाळी एक्स्प्रेस आधीच दोन तास उशिराने ठाण्यात आली होती. त्यात अचानक एक्स्प्रेसचा प्रवास सीएसएमटीऐवजी ठाण्यात समाप्त करून आम्हाला निष्कारण शिक्षा दिली. प्रवाशांना अशाप्रकारे वाऱ्यावर सोडण्याचा रेल्वेचा कारभार संताप आणणारा आहे, अशी प्रतिक्रिया अंधेरी येथील सायली कदम यांनी दिली. मुंबईत येणाऱया प्रवाशांना हजार-बाराशेहून अधिक पैसे मोजून घर गाठावे लागले.

Comments are closed.