Photo – ‘कुछ कुछ होता है’ला 27 वर्ष पूर्ण, करण जोहरनं शेअर केले सेटवरील खास फोटो

बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाला 27 वर्ष पूर्ण झाले.

करण जोहर याने दिग्दर्शन केलेला हा चित्रपट 16 ऑक्टोबर 1998 रोजी प्रदर्शित झाला होता.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन 27 वर्ष झाल्याने करण जोहर याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

करण जोहर याने चित्रिकरणादरम्यानचे काही खास फोटो शेअर केले आहे. विशेष म्हणजे करणने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट होता.

करणने शेअर केलेल्या फोटोंमध्ये शाहरूख खान, काजोल, राणी मुखर्जी, अनुपम खेर, रिमा लागू, अर्चना पूरण सिंह यांच्यासोबत करणचे वडील यश जोहर आणि कोरिओग्राफर फराह खानही दिसत आहे.

‘कुछ कुछ होता है’ची 27 वर्ष!! सेटवरील काही सुंदर आणि कँडीड आठवणी. प्रेमाने, खूप मस्करीने आणि आनंदाने भरलेला सेट, असे कॅप्शन देत करणने हार्टचा इमोजी शेअर केला आहे.

दरम्यान, करण जोहरने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सलमान खान दिसत नसल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटानमध्ये ‘अमन’ची भूमिका साकारली होती, मात्र त्याचा एकही फोटो शेअर न केल्याने चाहते नाराज झाले आहेत.

Comments are closed.