ईस्पोर्ट्स: तरूण भारतीयांसाठी एक विश्वासार्ह आणि महत्त्वाकांक्षी करियरचा मार्ग
“सतत काम आणि शून्य खेळ यामुळे आयुष्य कंटाळवाणे होते,” अशा अर्थाची एक जुनी म्हण आहे. पण कामच खेळ बनते तेव्हा सगळे बदलते. आज आपण हेच पाहत आहोत, कारण भारतीयांची एक नवीन पिढी गेमिंग, विशेषतः ईस्पोर्ट्सकडे एक गंभीर आणि फायदेशीर करिअर म्हणून पाहू लागली आहे.
सेन्सॉर टॉवरच्या मते मागील आर्थिक वर्षात भारत ८.४५ अब्ज इंस्टॉलमेंटसह जगातील सर्वात मोठा मोबाइल गेमिंग बाजार ठरला. लुमिकाईच्या अहवालातून असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत भारतात ५९१ दशलक्ष गेमर होते. त्यामुळे भारत हा चीननंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठी गेमिंग लोकसंख्या ठरलाआहे. ईस्पोर्ट्स खेळाडूंची संख्या २०२१ मध्ये १.५ लाख होती. ती २०२७ पर्यंत १.५ दशलक्ष होण्याची अपेक्षा आहे. एकेकाळी मनोरंजन म्हणून ओळखले जाणारे ईस्पोर्ट्स – प्रत्यक्ष पैसे न देणारे कौशल्याधारित स्पर्धात्मक गेमिंग मानले जात होते. ते आता महानगरे आणि लहान शहरांमध्ये एक विश्वासार्ह व्यवसाय बनले आहे.
वाढता स्वीकार आणि जागतिक मान्यता
ईस्पोर्ट्सला अधिकृत खेळ म्हणून मान्यता देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे भारतीयांमध्ये गेमिंगबाबत धारणा बदलल्या आहेत. आता ई-स्पोर्ट्स आणि जुगार यांच्यातील फरक समजून घेण्यास मदत झाली आणि इतर खेळांप्रमाणेच संस्थात्मक समर्थन, नियमन आणि प्रतिभा विकासाचे मार्ग मोकळे झाले.
ईस्पोर्ट्सना जागतिक स्तरावरही मान्यता मिळाली आहे. २०२२ च्या आशियाई खेळांमध्ये त्याचा समावेश मेडल स्पोर्ट म्हणून केला गेला आणि २०२६ मध्येही ते समाविष्ट होतील. येत्या २०२७ मध्ये रियाधमध्ये प्रथमच ऑलिंपिक ईस्पोर्ट्स गेम्सचे आयोजन केले जाईल.
भारत ईस्पोर्ट्स पॉवरहाऊस म्हणून उदयास येण्यास उत्तम स्थितीत आहे. यंदा ईस्पोर्ट्सचा विकास महानगरांपलीकडे होऊ लागला आहे. देशातील सुमारे दोन तृतीयांश खेळाडू टियर-२ आणि टियर-३ शहरांमधील आहेत तर त्यातील बरेच जण १८ ते ३० वयोगटातील असून त्यांना प्रथमच उत्पन्न मिळाले आहे. फिक्की-ईवायनुसार भारतातील ईस्पोर्ट्स स्पर्धांमधील सहभाग २०२२ मध्ये १० लाखांवरून २०२४ मध्ये २० लाखांपर्यंत दुपटीने वाढला आहे.
बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया सिरीज (बीजीआयएस), बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया प्रो सिरीज (बीएमपीएस) आणि बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया चॅम्पियनशिप (बीएमायसी) अशा कार्यक्रमांनी प्रादेशिक प्रेक्षकांसमोर उच्चस्तरीय स्पर्धात्मक खेळ आणला आहे आणि भारतीय ईस्पोर्ट्सना आंतरराष्ट्रीय नकाशावर स्थान दिले आहे.
करिअर आणि जबाबदार वाढ
लहान शहरांमधील तरुणांसाठी मर्यादित नोकरीचे पर्याय असलेल्या ईस्पोर्ट्समध्ये खेळणे, प्रसारण, साधन आणि कार्यक्रम निर्मितीमध्ये विविध संधी उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष स्पर्धांमुळे स्टेजिंग, लॉजिस्टिक्स आणि हॉस्पिटॅलिटी अशा क्षेत्रात तात्पुरते रोजगार देखील निर्माण होतात.
खेलो इंडिया युथ गेम्समध्ये ईस्पोर्ट्सचा समावेश केल्याने तरुण प्रतिभेसाठी तळागाळात वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे. उद्योग-व्यापी उपक्रम आता जबाबदार गेमिंगवर केंद्रित आहेत. त्यात वयानुसार प्रवेश आणि बेकायदेशीर सट्टेबाजीवर निर्बंधांबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
संघटित स्पर्धा, शैक्षणिक संबंध आणि जबाबदार कार्यपद्धतींसह भारतातील ईस्पोर्ट्स स्पर्धा सर्जनशीलता आणि समुदायाचे मिश्रण करणारी एक कायदेशीर परिसंस्था म्हणून विकसित होत आहे. प्रश्न आता ईस्पोर्ट्स एक करिअर असू शकते का हा नाही – तर किती तरुण भारतीय त्यात प्रवेश करण्याचा पर्याय निवडतील हा आहे.
आणखी वाचा
Comments are closed.