Karan’s murder was committed on the orders of criminal Harshad Patankar; Minor gangs rioted, the gang took revenge for the murder three months ago
कामटवाडे येथे साडेसतरा वर्षीय करण चौरे याचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या दोन विधीसंघर्षित बालकांसह तीन आरोपींना नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा ताब्यात घेतले आहे. करणचा खून सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याच्या सांगण्यावरून केल्याचे संशयित आरोपींनी पोलिसांना सांगितले. (Karan’s murder was committed on the orders of criminal Harshad Patankar; Minor gangs rioted, the gang took revenge for the murder three months ago)
करण उमेश चौरे (वय १७, रा. संत कबीरनगर, नाशिक) असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. मोहन ज्ञानेश्वर वायचळे (वय १८ वर्षे ६ महिने, रा. कामगार नगर, तिरंगा चौक, सातपूर, नाशिक), राहुल राजू गडदे (२० वर्षे, रा. आनंदवल्ली, मूळ रा. नांदुर कोंडार, ता. नांदगाव जि. नाशिक), साहिल पिंटु जाधव (२१ वर्षे रा. आनंदवली, माळी वाडा, गंगापूर रोड, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
शहर गुन्हे शाखा युनिट एककडील अधिकारी व अंमलदार खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. पथकाला पोलीस हवालदार विशाल काठे व प्रशांत मरकड यांना सोमवारी (दि.२८) करण चौरे खून प्रकरणातील आरोपी आसारामबापू पूल, गंगापूर येथे थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सदर परिसरात आरोपींचा शोध घेतला. पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपींनी पळ काढला. पोलिसांची गाडी पाहून मुले पळाल्याने पोलिसांचा संशय बळावला. पथकाने सोमवारी सायंकाळी ७.१७ वाजता संशयित पाचही जणांना ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीत या संशयित मारेकऱ्यांनी सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली दिली. संशयितांना पुढील कारवाईसाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, प्रशांत मरकड, विशाल काटे, नाझीमखान पठाण, योगीराज गायकवाड, रोहिदास लिलके, नाईक विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, अंमलदार मुक्तार शेख, अमोल कोष्टी, राम बर्डे, अनुजा येलवे, चालक सुकाम पवार, समाधान पवार यांनी केली.
- अवघ्या चार तासांत करण चौरे खूनाचा उलगडा
- करणचा पाच जणांनी केला दगडाने ठेचून खून
- बापू पूल परिसरातून पाच जणांना घेतले ताब्यात
- हल्लेखोरांमध्ये दोन विधीसंघर्षित बालके
- नाशिक गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई
कोण आहे हर्षद पाटणकर

Comments are closed.