Kareena Kapoor: ना बिकिनी ना वन पीस; ग्रीसमध्ये करीना कपूरचं थेट लुंगीमध्ये फोटोशूट
बॉलिवूडमधील फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी करीना कपूर पुन्हा एकदा तिच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. या वेळी ना बिकिनी, ना हाय-फॅशन वनपीस करीना थेट ‘लुंगी’मध्ये ग्रीसच्या किनाऱ्यावर फोटोशूट करताना दिसली. तिच्या या देसी आणि दिलखुलास अंदाजाने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. (kareena kapoor lungi look in greece)
सध्या करीना ग्रीसमध्ये तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. गुरुवारी तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले, जे पाहून नेटकऱ्यांनी अक्षरशः कौतुकाचा वर्षाव केला. ती एका पिवळ्या टॉप आणि तपकिरी लुंगी स्टाईल स्कर्टमध्ये दिसली. सोबत मॅचिंग टोपी आणि काळे सनग्लासेस पण कोणतीही जड अॅक्सेसरी नाही. फक्त पोशाख आणि आत्मविश्वासाचा मिलाफ या फोटज्मध्ये पाहायला मिळाला.
कॅप्शनमध्ये करीनाने लिहिलं ‘ग्रीसमध्ये लुंगी डान्स केला… मजा आली, नक्की ट्राय करा’ (did lungi dance in greece…had fun..must try) आणि हे वाक्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. देसी स्टाईलमध्ये भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर करीना आपला स्वॅग दाखवत होती.
करिनाच्या या स्टाईलचं केवळ चाहत्यांनीच नाही, तर फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि रिया कपूर यांनीही भरभरून कौतुक केलं. काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या तिच्या मोनोकिनीतील फोटोदेखील तितकेच लोकप्रिय ठरले होते, पण या वेळी तिच्या ‘लुंगी लूक’ने वेगळाच प्रभाव टाकला. ज्यामुळे पुन्हा एकदा करीना चर्चेचा विषय ठरली आहे.
Comments are closed.