टोरंटविरोधात कर्जतमध्ये कडकडीत बंद; शिवसेनेच्या आवाहनाला प्रतिसाद, हजारो झाडांच्या कत्तलीचा केला निषेध

विकासाच्या नावाखाली कर्जत-भीमाशंकरचे जंगल टोरंट कंपनीसाठी बेचिराख करणाऱ्या सरकारविरोधात आज कर्जतमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. ‘टोरंट कंपनी हटाव.. जंगल बचाव’ अशी हाक देत शिवसेनेने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कर्जत, नेरळ, कडाव, कशेळे, कळंब आणि माथेरानमधील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. व्यापारी, विविध सामाजिक संस्था, नागरिक तसेच महिलांनी रस्त्यावर उतरत टोरंट चलेजावच्या घोषणा दिल्या.

कर्जत तालुक्यातील पाली-साई डोंगर 1 परिसरात टोरंट पॉवर कंपनीसाठी भीमाशंकरच्या जंगलातील जवळपास साडेतीन लाख झाडे तोडण्यात येणार असून आतापर्यंत तीन हजार झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे सह्याद्रीच्या जंगलावर, जैवविविधतेवर, वन्यजीवांच्या अधिवासावर आणि स्थानिक पर्यावरणावर परिणाम होण्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रकल्पाला विरोध करत गेल्या काही दिवसांपासून विविध संघटना आणि पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरू झाले आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनीही प्रकल्पाविरोधात कर्जत बंदचे आवाहन केले होते त्याला आज कर्जतकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठा बंद ठेवल्या.

प्रेस क्लबचे प्रशासनाला निवेदन

कर्जत प्रेस क्लब आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने या वृक्षतोडीचा तीक्र निषेध नोंदकत वृक्षतोड तत्काळ थांबकिण्याची मागणी केली. यासंदर्भात कर्जतचे उपकिभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ आणि तहसीलदार डॉ. धनंजय जाधक यांना निकेदन सादर करण्यात आले. याकेळी रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष संजय मोहिते, सचिक दर्वेश पालकर, अध्यक्ष गणेश पवार, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, संजय गायककाड, विद्यानंद ओव्हाळ, संतोष दळकी, जयकंत हाबळे, दीपक पाटील, मल्हार पवार, मोतीराम पादिर, अनिल गकळे, संजय अभंगे, गणेश पुरकंत, किलास श्रीखंडे, ज्ञानेश्वर बागडे आदी पत्रकार उपस्थित होते.

सर्वपक्षीयांचा सहभाग

आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, कर्जत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संतोष पाटील, कर्जत पर्यावरण बचाव संघर्ष समितीचे ऍड. कैलास मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ऍड. भाऊ मोरे यांच्यासह  अजित पवार गट, काँग्रेस पार्टी, आरपीआय, राष्ट्रीय समाज पार्टी, वंचित आघाडी, आगरी समाज संघटना, अखिल भारतीय कुणबी 4 मराठी समाज, शेकाप, भारतीय कम्युनिष्ठ, कर्जत तालुका बौद्ध विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Comments are closed.