VIDEO: रणजी ट्रॉफी फायनलमध्ये राडा! फलंदाजाने मारले फिल्डरच्या डोक्यात, केएल राहुलही भिडला

रणजी ट्रॉफी २०२५-२६मध्ये कर्नांटक विरुद्ध जम्मू-काश्मीर असा अंतिम सामना सुरू आहे. आजचा (२५ फेब्रुवारी)या सामन्याचा दुसरा दिवस असून मैदानावर वातावरण तापलेले दिसले. पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या जम्मू-काश्मीरचा कर्णधार पारस डोग्रा कर्नाटकच्या क्षेत्ररक्षकांसोबत वाद घालताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ही घटना जम्मू-काश्मीरच्या पहिल्या डावातील १०१व्या षटकात घडली. केव्ही अनीश शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर पारसने शॉट खेळला आणि तो चेंडू सीमारेषेवर गेला. तेव्हा पारस त्याचा सहकारी कन्हैया वधावनसोबत बोलत होता आणि अनीशने स्लेजिंग सुरू केली. त्यामुळे पारस नाराज दिसला आणि त्याने त्याच्या डोक्याला डोके भिडले.

कर्नाटकचा वरिष्ठ खेळाडू मयंक अग्रवाल आणि मैदानावर उपस्थित असलेल्या पंचांनी मध्यस्थी केली. त्यांनतर पारसला त्याची चूक कळाली आणि त्याने माफीही मागितली, मात्र अनीशला ते कमी वाटले. तसेच अग्रवाल आणि केएल राहुलनेही स्लेजिंग सुरूच ठेवली.

या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पारसला वैशाक विजयकुमारचा बाउंसर ग्लोव्ह्जला लागला ज्यामुळे तो ९ धावांवर असताला रिटायर-हर्ट झाला.

दुसऱ्या दिवशी आणखी एक घटना घडली. जेव्हा वैशाक आणि वधावन यांचा खांदा एकमेकांना लागला. त्यावर पंच रोहित पंडितने वधावनसोबत चर्चा केली आणि त्यानेही हसत ते टाळले.

या सामन्यात जम्मू-काश्मीरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या डावात ५ विकेट्स गमावत ४५० आकडा पार केला आहे. यामध्ये शुभम पुंडीरच्या १२१ धावा, यावेर हसनच्या ८८ धावा, कन्हैया वाधवानच्या ७० धावा आणि अब्दुल समादच्या ६१ धावांचा समावेश आहे.

तसेच पारस ६५ धावा आणि साहिल लोट्रा २५ धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहेत. कर्नाटककडून या डावात सर्वाधिक विकेट्स प्रसिद्धने घेतल्या. त्याने यावेर, समाद आणि कामरान इक्बाल यांना बाद केले.

Comments are closed.