अविश्वसनीय! वनडे क्रिकेटमध्ये या भारतीय फलंदाजाची तीन आकडी सरासरी, आता तरी संघात संधी मिळेल का?
भारतीय फलंदाज करुण नायर सध्या जारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकामागून एक स्फोटक खेळी खेळतोय. आता विदर्भाच्या या कर्णधारानं महाराष्ट्राविरुद्ध उपांत्य सामन्यात धमाकेदार खेळी करत आपली सरासरी 752 पर्यंत नेली. यापूर्वी त्यानं स्पर्धेत पाच शतकं ठोकली आहेत.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, करुण नायर या सामन्यात पुन्हा एकदा नाबाद परतला. त्यानं आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफीच्या 7 डावांमध्ये फलंदाजी केली, ज्यापैकी तो 6 वेळा नाबाद परतला आहे. महाराष्ट्राविरुद्धच्या उपांत्य सामन्यात नायरला शतक झळकावता आलं नाही, पण त्यानं 88 धावांची नाबाद खेळी केली. करुण नायरनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत धमाकेदार खेळ केला. त्यानं 44 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 88 धावा केल्या. या डावात नायरचा स्ट्राईक रेट 200 होता. त्याच्या खेळीमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली.
या सामन्यात महाराष्ट्रानं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विदर्भानं 50 षटकांत 3 गडी गमावून 380 धावा केल्या. संघाकडून सलामीला आलेल्या ध्रुव शोरी आणि यश राठोड यांनी शतकं झळकावली. ध्रुवनं 14 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 114 धावा केल्या. याशिवाय यशनं 14 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 116 धावा केल्या. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 224 धावांची भागीदारी केली.
करुण नायरनं आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफीमध्ये 8 सामने खेळले आहेत. या पैकी 7 डावांमध्ये फलंदाजी करताना त्यानं 752 च्या सरासरीनं 752 धावा केल्या आहेत. या काळात नायरनं 5 शतकं आणि 1 अर्धशतक झळकावलं. तो सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत आहे, त्यामुळे त्याची टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याची शक्यता वाढत आहे.
हेही वाचा –
जसप्रीत बुमराहनं घेतला फेक न्यूज पसरवणाऱ्यांचा समाचार, फिटनेसच्या अफवांना थेट उत्तर
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! तीन महिन्यानंतर मैदानावर परतला स्टार खेळाडू
रिषभ पंत रणजीमध्ये करणार दिल्लीचं नेतृत्व, कोहली खेळणार की नाही?
Comments are closed.