तुफानी कामगिरी करत 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय कसोटी संघात करुण नायरने मिळवले स्थान !
मागच्या खूप दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे, पण आता निवडकर्त्यांनी जवळजवळ 8 वर्षांआधी कसोटी सामने खेळणाऱ्या करूण नायरचे (Karun Nair) नाव शनिवारी इंग्लंड दौऱ्यासाठी घोषित केलेल्या 18 खेळाडूंच्या यादीमध्ये सामील केलं. यासोबतच त्याचा 8 वर्षांचा वनवास संपला आहे. करूण नायरने मागच्या दोन घरेलू हंगामात त्याच्या तुफानी प्रदर्शनाने त्याची दखल घेण्यासाठी निवडकर्त्यांना भाग पाडलं. चला तर जाणून घ्या करूण नायरची शानदार कामगिरी.
यावर्षी करूणने त्याच्या बॅटमधून तुफानी पारीची सुरुवात केली. घरेलू सीझनमध्ये विदर्भासाठी खेळणाऱ्या 33 वर्षांच्या करूण नायर जरी हंगामात सर्वात जास्त धावा करण्याच्या यादी सातव्या नंबर वर राहिला तरी देखील त्याने 10 सामन्यांच्या 17 डावांमध्ये 2 शतक आणि 3 अर्धशतक 40.58 च्या सरासरीने 690 धावा केल्या आणि त्याची ही कामगिरी निवडकर्त्यांपर्यंत पोहोचली.
जी सुरुवात करूण नायरने मागच्या हंगामात केली होती, नायर सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये 2024 मध्ये सातव्या नंबर वर राहिला त्याने या मागच्या हंगामात आघाडी घेत चौथ्या नंबरचे स्थान मिळवले. करूणने खेळलेल्या 9 सामन्यांच्या 16 डावांमध्ये 4 शतक 2 अर्धशतक आणि 53.93 च्या सरासरीने 863 धावा केल्या. त्याच्या नेतृत्वात विदर्भने 2025 रणजी ट्रॉफी जिंकली.
तसेच विजय हजारे स्पर्धेमध्ये व्हाईट बॉल स्पर्धेत अजून एक तुफानी प्रदर्शन करत करूणने रणजी ट्रॉफीच्या दोन वर्षांच्या प्रदर्शनामध्ये अजून तुफानी कामगिरी केली,
पण त्याच्या या फॉर्ममध्ये ती निरंतरता राहील की नाही याची निवडकर्त्यांना गॅरंटी नाही. त्याचबरोबर ही गोष्ट खरी आहे की, त्याच्या खेळातील प्रदर्शनामुळे निवडकर्त्यांनी त्यांनी त्याची दखल घेतली. तसेच जेव्हा रोहित (Rohit Sharma) आणि विराटने (Virat Kohli) निवृत्ती घोषित केली. तसेच इंग्लंडचे आव्हान बघता, यावेळी आगरकर (Ajit Agarkar) करूणकडे दुर्लक्ष करू शकले नाहीत आणि तेच खरे ठरले.
करूणने भारतासाठी खेळलेल्या 6 कसोटी मालिकांच्या 7 डावांमध्ये नाबाद 3 शतके झळकवत 22.633 च्या सरासरीने 374 धावा केल्या आहेत. करिअरच्या तिसऱ्या कसोटी पारीमध्ये करूण नायरने 2016 डिसेंबरमध्ये इंग्लंड विरुद्ध चेन्नईमध्ये नाबाद 303 धावा करून क्रिकेट विश्वाला आश्चर्यचकित केले होते. पण येथून पुढच्या पाच डावांमध्ये त्याची सर्वोत्तम खेळी 26 राहिली. त्यानंतर त्याला टीम इंडियामधून (Team india) बाहेर करण्यात आले. करुणने त्याचा शेवटचा कसोटी सामना 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाळामध्ये खेळला होता. शेवटच्या डावात त्याने पाच धावा केल्या होत्या.
Comments are closed.